किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था द्वारे दिनदर्शिका 2025 चे थाटात प्रकाशन*

नागपूर/प्रतिनिधी: सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपूर द्वारे दिनदर्शिका 2025 चे थाटात प्रकाशन करण्यात आले. भरगच्च भरलेल्या सभागृहामध्ये आयकर विभागाचे उपनिदेशक अनिल खडसे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रकाश तायवाडे सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक,अनिल खडसे उपनिदेशक आयकर विभाग ,अरविंद डोंगरे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, प्रदीप बोरकर सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,कावळे गुरुजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.

सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपुर मुख्यता विद्यार्थी शिक्षण या क्षेत्रामध्ये मागील बारा वर्षापासून कार्य करत आहे .गरीब होतकरू विद्यार्थ्यांना खेड्यापाड्यामधून शहरांमध्ये आणून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासोबतच त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करत आलेली आहे .याचेच फलित म्हणून या कालावधीमध्ये संस्थेचे जवळपास 52 विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये समाविष्ट झालेली आहेत.
संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी एक म्हणजेच दरवर्षी प्रकाशित होणारी दिनदर्शिका. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सणांसोबतच देशभरातील संत, समाज सुधारक आणि पुरोगामी विचारांचे धुरी अशा व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी तसेच इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना, थोरांचे सुविचार ,कवन आणि कविता यांच्या माध्यमातून बहुजनांची चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल खडसे (IRS) यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सधन आणि सुशिक्षित वर्गाने समोर येण्याचे आवाहन केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरविंद डोंगरे यांनी समाजाचा उत्कर्ष साधायचा असेल तर आपल्या महापुरुषांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रकाश तायवाडे यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित समाजातील विविध समाजसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्थेच्या सामाजिक बांधिलकी बद्दल चे भाष्य करून गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष खंडाळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष गोपाल वानखेडे यांच्या सोबतच मनीषकुमार अडागळे , प्रकाश तायवाडे, राजेश वानखेडे, संतोष नृपनारायण ,डॉ.किरणकुमार मनुरे, संजय तायवाडे ,उल्हास वानखेडे, प्रभानंद बावणे , अमित वाघमारे, सुभाष खंडाळ,प्रकाश लोखंडे तसेच जिजाऊ-सावित्री-मुक्ता विचार मंचच्या दीपिका अडागळे,सुरेखा तायवाडे, संध्या अडागळे ,वर्षा वानखेडे ,प्रतिभा खंडारे, स्वाती वाघमारे , प्रिया बावणे, संध्या अडागळे,सौम्या,यथार्थ यांचे सहकार्य लाभले.

125 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.