बीटस्तरीय नवरत्न स्पर्धेत जि प टेकामांडवा शाळेचे घवघवीत यश।
जिवती/प्रतिनिधी: शिक्षण विभाग चंद्रपूर तर्फे घेण्यात येत असलेल्या नवरत्न स्पर्धेमध्ये जिवती पंचायत समिती अंतर्गत टेकामांडवा या बीटाच्या बीटस्तरीय नवरत्न स्पर्धेत जि प उ प्रा शा टेकामांडवा शाळेने पाच प्रथम व पाच द्वितीय क्रमांकाची बक्षिसे मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे।
मु अ एल एम पवार व दीपक गोतावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जी एस पांचाळ ,पायल कुकडे, जयश्री घोळवे, माधव चलवाड, दत्ता नांदुरे यांच्या अथक परिश्रमातून केंद्रस्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातून कथाकथन स्पर्धेत तेजस्विनी प्रकाश सोलनकर प्रथम क्रमांक, वादविवाद व स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत तनुश्री तुळशीराम नरोटे प्रथम क्रमांक, एकपात्री अभिनय स्पर्धेत साई श्रद्धा श्रीराम भगत प्रथम क्रमांक, चित्रकला स्पर्धेत साई श्रद्धा श्रीराम भगत द्वितीय, स्मरणशक्ती स्पर्धेत पायल राहुल लेंगरे द्वितीय, तर प्राथमिक गटातून श्रेया सुभाष तांबरे चित्रकला स्पर्धेत प्रथम ,बुद्धिमापन स्पर्धेत शिवम हरिश्चंद्र पोले द्वितीय, एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रीदेवी किसन सलगर द्वितीय, कथाकथन स्पर्धेत संध्या लक्ष्मण आईतवाड हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे।
त्यांच्या या विजयाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच समस्त पालक वृंद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ।