कृषीकन्या पल्लवी पंडितराव सोळंके यांनी बैलपोळ्या निमित्त केले वृक्षारोपण
किनवट : तालुक्यातील कोल्हारी येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक संलग्म- 2021 -22 अंतर्गत कृषीकन्या पल्लवी पंडितराव सोळंके यांनी बैलपोळ्या निमित्त वृक्षारोपण केले.
राजीव गांधी कृषि महाविद्यालय, जिंतूर रोड परभणी येथील कृषिकन्या पल्लवी पंडितराव सोळंके हिने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक संलग्म- 2021 -22 कार्यक्रमा अंतर्गत मौजे कोल्हारी येथील जयभीमनगरात पोळा सनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरीक शषिकलाबाई शेळके, शेतकरी पुत्र समर्थ धम्मानंद कानिंदे, विद्यार्थी वैभव माधव बडेलू आदींसह बहुतांशी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य एस.डी. जेठूरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.ए. शेख,प्रा.जी.जे. काळे, श्रीमती प्रा.पी.ए. कौसडीकर, डॉ.व्ही.व्ही. वट्टमवार आदिंनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील विविध समस्या व निरसन, माती परीक्षण, जलसंवर्धन, बीज प्रक्रिया, पिकांवरील किड, रोग, विविध नवीन कृषि उद्योग व शेती विषयक संकल्पना यावर शेतकर्यांशी संवाद साधला.