वनविभागाच्या वतिने वृक्ष तोडीवर धडक कारवाई सागवान सह ट्रक्टर जप्त
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.29.जिल्यातील मुखेड तालुक्यात अनेक ग्रामीण भागात अवैधरीत्या वृक्षतोड होत असल्याच्या बातम्या वृतमान पञातुन बातम्या प्रकाशीत होवून देखील वनविभाग झोपेचा सोंग घेत होते. माञ काल दि.२७ जानेवारी रोजी उपवनसंरक्षक अमोल सातपुते , ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून बाऱ्हाळी परिसरातील मौजे निवळी येथे अवैधरित्या तोडून वाहतूक करत असलेला सागवान अंदाजे 2-3 घनमीटर माल जप्त करून कारवाई करण्यात आली.पुढील कायदेशीर कारवाई वनपरिमंडळ अधिकारी अभय सेवलकर,वनरक्षक धम्मपाल सोनकांबळे करत आहेत.सदर माल वनपरिक्षेत्र कार्यालयात घेवून गेले असुन.सदर कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी.एस. डी हराळ,वनपरिमंडळ अधिकारी ए. पी.सेवलकर श्री.एम.एम पवार वनरक्षक डी.डी सोनकांबळे,पी. एन शिरुरे,आर.के राठोड, ए. एन राठोड,आर.एन कराड,एम जी गोपुलवाड डी. एस घुगे व मेहबूब शेख यांचा समावेश होता.सदर कारवाईत अंदाजित रक्कम ४२००० ते ४५००० रुपयांचा सागवान ट्रॅक्टर अंदाजित किंमत 2 लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.