अपारंपारीक प्रकल्पाचे उद्घाट्न केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करणार
किनवट ता.प्र दि २० केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अपारंपारीक उर्जेच्या आहवानामुळे देशाच्या ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, आज देशाची इंधनाची गरज ही परकिय देशातुन इंधन आयात करुन भागवली जाती त्यामुळे देशातील चलन हे बाहेर देशात जाते त्यामुळे भारतीय रुपयाचे अवमुल्यन होते परंतु आता ग्रामिण भागात उसाच्या मळीपासुन इथेनॉल, विविध प्रकारच्या गवता पासुन भविष्यातील इंधन तयार होणार आहे त्यासाठी राज्याच्या विविध संस्था, शेतकरी समुह हे सरसावले आहे. अशाच प्रकारे किनवट तालुक्यातील १२०० शेतक-यांनी एकत्रयेत स्थापन केलेला शेतकरी समुह सारखणी फार्मर प्रोड्युसर कंपनी ने देखिल पुढाकार घेतला असुन त्यांनी अपारंपारीक उर्जा निर्मितीचा एक प्रकल्प किनवट तालुक्यात सुरु करण्याचा मानस आखला आहे त्याकरिता संबधित विभागाच्या संमत्तीने ते हा प्रकल्प सुरु करणार असुन त्यासाठी सारखणी फार्मर प्रोड्युसर या शेतक-यांच्या समुहाने थेट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट मागितली आहे तर ते त्यांच्या अपारंपारीक प्रकल्पाचे उद्घाट्न केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे डिसेल व पेट्रोल या पारंपारीक इंधना ऐवजी सौरउर्जा, इथेनॉल, बॅटरीवर आधारीत वाहने, बायोफ्युल या अपारंपारीक इंधना करिता आग्रही आहेत त्याकरिता त्यांनी देशात व राज्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे व जनजागृती सुध्दा केली आहे. त्यासोबतच त्यांनी नुकतेच नागपुर येथे सौरउर्जेचा मोठा प्रकल्प कार्यान्वित केला आहे तर त्यांनी देशात अपारंपारीक उर्जेच्या वापर व निर्मितीच्या दृष्टीने कायदे व नियमावली बनवण्यास देखिल सुरवात केली आहे तर त्यांच्या या अपारंपारीक उर्जेच्या आहवानाला साथ देत देशातील अनेक बहुराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या कंपनी मार्फत आगामी वर्षात फक्त अपारंपारीक उर्जेवर चालणा-या वाहनांचीच निर्मिती करण्यात येईल असे घोषीत केले आहे.
त्यासंबधी सर्व कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर तारीख कळवण्यात येईल असे ही सारखणी फार्मर कडुन कळवण्यात आले आहे या प्रकल्पाच्या जडण घडण व कार्यप्रणाली संबधीत वरीष्ठस्थरावर पाठपुरावा हे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद चे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर करत असुन किनवट माहुर तालुक्याच्या शेतक-यांना त्यांच्या शेतातील उत्पन्न शिवाय इतर उत्पन्न मिळवुन देण्याकरिता सारखणी फार्मर चे पदाधिकारी झटत आहे.