किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नाभिक समाजाला रविवारी सलून सुरू ठेवण्याची परवानगी द्या ; नाभिक युवा शक्ती सर्व समाज बांधवांचीमागणी

नागभीड प्रतिनिधी: तालुक्यातील तळोधी परिसरातील 42 गावांतील नाभिक समाज बांधवाना त्यांचे सलून रविवारी खोलण्याची मुभा द्यावी. अशी मागणी तळोधी येथिल नाभिक युवा शक्ती सर्व समावेशक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रत्येक लॉगडाऊन काळात नाभिक समाजाचे सलून बंद पाडण्याची परंपराच शासनाने आखली आहे. जेव्हा -जेव्हा राज्य असो वा केंद्र शासन असो लॉगडाऊन सुरु झाला की नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाला बंद पाडल्या जात आहे. त्यामुळे समाजातील जवळपास 20 लोकांनी व्यवसाय बुडल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे.नाभिक समाजातील विविध संघटनांनी त्यांच्या मागण्या घेऊन शासनाला आजपर्यंत अनेक निवेदने दिली.उपोषणे केली.मात्र शासनाने नाभिक समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत. नाभिक समाजाला कुठल्याही मदतीविना वंचित ठेवले.त्यामुळे नाभिक समाजाची आर्थिक स्थिती पूर्णत: खालावलेली आहे.आजही राज्यात लॉगडाऊन सुरू आहे. आणि सकाळी 7 ते 4 पर्यन्तच दुकानें सुरु आहेत. मात्र शनिवार,रविवारी सर्व दुकानें बंद ठेवण्याचे आदेश आहेत. रविवार हा दिवस सलून धारकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. दरम्यान रविवार या दिवशी तळोधी परिसरातील 42 गावांतील नाभिक समाज बांधवाना सलून सुरु ठेवण्याची मुभा द्यावी अशी मागणी नाभिक युवा शक्ती सर्व समावेशक संघटन,महाराष्ट्र.शाखा -तळोधी( बा.)या संघटनेनी केली आहे.

कोट :-

तळोधी,सावरगाव,वाढोणा आदी गावांतील काही सलून धारक रविवारीही सलून सुरु ठेवतात.त्यांना कोणी काहीही म्हणत नाही. मात्र आम्ही पदाधिकाऱ्यांनी सलून खोलले की बंद पाडल्या जाते. त्यामुळे रविवारी सलून खोलण्याची शासनाने परवानगी द्यावी. अशी संघटनेची रास्त मागणी आहे.

60 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.