नांदेड महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर ताईंनी केले एकदिवशीय उपोषण
*आम आदमी पक्षाने दिला पाठिंबा,माकप,सीटू आणि जमसं च्या आंदोलनास पाच दिवस पूर्ण*
*जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यासाठी २३ फेब्रुवारी पासून आंदोलन सुरु (मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच रहाणार – माकप)*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.30.आशांचा प्रोत्साहन भत्ता बँक खात्यावर टाकण्यात यावा ही मागणी घेऊन सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या आशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय उपोषण करून २३ तारखेपासून सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला.
आशांच्या मागण्या महापालिकेच्या आयुक्त आणि आरोग्य विभागाशी संबंधित असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी तातडीने दखल घेत आरोग्य अधिकारी डॉ.बिसेन व आरोग्य अभियानातील इतर जबाबदारांच्या उपस्थितीत आपल्या कक्षात बैठक बोलावून पुढील सर्व साधारण सभेत मंजूरी घेऊन पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
एक आठवड्या पासून सुरु असलेल्या आंदोलनामध्ये थोडा बदल करण्यात आला असून दि.२८ फेब्रुवारी पासून अमरण उपोषणा ऐवजी नव्याने पत्र देऊन साखळी उपोषण करण्याचा निर्णय माकप,सीटू व जनवादी महिला संघटनेने घेतला असून तसे रीतसर पत्र दि.२८ रोजी प्रशासनास देण्यात येईल आणि एक मार्च रोजी तिसरे आंदोलन सुरु करीत असल्याचे सीटूच्या राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार यांनी घोषित केले आहे.
साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन किमान ५ एप्रिल पर्यंत चालविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.आंदोलनाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.श्याम सरोदे,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड, कॉ.सोनाजी कांबळे,कॉ.लता गायकवाड, अनुसया कांबळे,कॉ.भास्कर पाटोळे,दतोपंत इंगळे आदींनी केले.
आम आदमी पक्षाचे नेते नरेंद्रसिंग ग्रंथी,ऍड.अनुप आगासे,पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.कॉ.गंगाधर गायकवाड
जनरल सेक्रेटरी -सीटू नांदेड जिल्हा कमिटी यांनी अशी माहिती दिली आहे.