मनोज आव्हाड यांच्या मारेकय्रांना फाशीची शिक्षा द्या लहू सेनेचे एल्गार/ आक्रोश जोरदार निदर्शने आंदोलन
नागपूर: औरंगाबाद हडको येथे चोरीच्या संशया वरुन सात तेआठ जणांनी लाकडी काढ्याने मनोज शेषराव आव्हाड या मातंग तरूणाला बेदम मारहाण करून निर्घृण , क्रृर पणे हत्या करणाऱ्यां समाज कंठकांना फाशी ची शिक्षा देण्याची मागणी लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार/ आक्रोश आंदोलनात जोरदार निदर्शने आंदोलन करुन नागपूर जिल्हा अधिकारी साहेबां मार्फत मा.मुख्यमंत्री , ना.उद्धवजी ठाकरे साहेबांना निवेदन पाठविण्यात आले.
ही घटना अंत्यत दुदैवी व निंदनीय , क्रृर घटना आहे या घटनेचा तिव्र शब्दांत संजय कठाळे यांनी निषेध केला .
मुख्यमंत्री यांना खालील मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले.( 1) मारेकय्रां विरुध्द फास्ट ट्रॕक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी.(2) मनोज आव्हाड यांच्या कुटूंबियांना तात्काळ 10 लाख रुपया आर्थिक मदत सामाजिक न्याय विभागा तर्फे किंवा मुख्यमंत्री यांच्या निधि तून देण्यात यावी.(3) फरार आरोपीला ताबडतोब अटक करण्यात यावी.( 4) या कुटूंबातील सदस्यांवर काही राजकीय नेत्यां कडून, आरोपी च्या नातेवाईकां कडून दबाव टाकला जावू नये म्हणून संरक्षण देण्यात यावे.
वरील प्रकरणाची ताबडतोब दखल घ्यावी , अन्यथा महाराष्ट्र भरा तिव्र व उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा लहू सेना संस्थापक-प्रमुख संजय कठाळे यांनी दिला आहे.
या आंदोनात भैयाजी चौबे , जीवन गायकवाड , मुरलीधर रणखांम , शंकर बावने , प्रेम तायवाडे , मंगेश तायवाडे , कुशल लोखडे , संजय कठाळे ( केवळराम) , दिपक पवार , बादल रोकडे , प्रकाश वानखेडे , रोशन लांडगे , रुपेश तायवाडे , संजय तेलंग ,रुपेश वानखेडे, कैलास काचेवार , अशोक खडसे , सागर जाधव , महेश प्रधान , अंकित चन्ने , प्रकाश उकुंडे , अतुल लोखंडे , विजय डोंगरे , सुरेश कावळे , जितेंन्र्द गायकवाड , श्याम खडसे , राजेश यादव , दशरथ लोंडे , रत्नाकर वानखेडे , सचिन खडसे , यश कठाळे ईत्यादि आंदोलन उपस्थित होते,