किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

अवैध रित्या गाढवांची तस्करी करून परराज्यात घेवुन जाणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई..एकुण आठ लाख रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त…

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.12 रोजी मध्यरात्री 01.30 वाजताच्या सुमारास अवैध रित्या गाढवांची तस्करी करून परराज्यात घेवुन जाणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई केली आहे.

मा.पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड यांनी बिनतारी संदेशाव्दारे संदेश देवून शहरातील सर्व नाइट गस्त अधिकारी व अमलदार यांना सतर्क केले की,पुर्णा येथून एक महिन्द्रा बोलेरो पिकअप हे संशयीत रित्या भरधाव नांदेड शहराकडे येत असून त्याचा पाठलाग पुर्णा पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार करत आहेत.

त्यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे रात्रीला इतवारा डिव्हीजन गस्तसाठी असलेले अधिकारी सपोनि सुरेश थोरात व राजग्रस्त डयुटी अधिकारी म्हणून असलेले पोउपनि आनंद बिचेवार यांनी बिट मार्शल व डि.बी. पथकसह सदर संशयीत रित्या येणारे महिन्द्र बोलेरो पिकअप वाहन पकडण्यासाठी तात्काळ योग्य नियोजन करून दोन ठिकाणी नाकाबंदी असता.त्यात पोउपनि बिचैवार सोबत पोना / 1230 गव्हाणकर, पोकों / 1073 पवार, चालक पोना मजहर शेख यांनी पो.स्टे.ची बन मोबाईलसह ढवळे कॉर्नर येथे व सपोनि सुरेश थोरात साहेब यांनी सपोउपनि केंद्र,पोना हुमनाबाद यांचेसह पिटर मोबाईलने उस्माननगर रोडवर अलर्ट राहून संशयीत वाहन हे पो.स्टे. लिंबगाव, पो.स्टे. भाग्यनगर, पो.स्टे. शिवाजीनगर, पो.स्टे. वजिराबाद, पो.स्टे. इतवारा यांचे हद्दीतून पोस्टे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत दाखल झाले ते ढवळे कॉर्नर येथून भरधाव वेगात उस्माननगर रोड कडे गेल्याने ढवळे कॉर्नरवरील अधिकारी व अंमलदार यांनी वनमोबाईलने त्याचा पाठलाग केला व समोरुन सपोनि सुरेश थोरात व अमलदार यांनी महिन्द्रा बोलेरो पिकअप अडविले असता सदर वाहन चालकाने वाहन बंद करुन त्याचे सोबत असलेले इतर साथीदारांसह रोडच्या खालील दिशेने अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले.सपोनि सुरेश थोरात , पोउपनि बिचैवार व पो.स्टे. पुर्णा येथील सपोनि घाटे यांनी महिंद्रा बुलोरो पिकअप वाहनाची पाहणी केली असता वाहनाचा पासिंग नंबर AP-39-UB-0426 असा असून वाहनाच्या डाल्यामध्ये पाहिले असता गाढवांना त्यांचे चारही पाय बांधुन एकावर एक कोंबून टाकलेले दिसले.

सदरचे वाहन मॅकनिकच्या सहाय्याने चालू करण्याचा प्रयत्न केला चालू होन नसल्याने ते टोचनच्या सहाय्याने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण परिसरात लावण्यात आले वाहनांतील जवावरांचा पंचनामा केला असता सदर वाहनांत एकुण 16 गाढवे हे कोंबुन भरलेले बाहेर काढले असता त्याच्यातील एक गाढव हा मयत झाल्याचे दिसले.

उर्वरित 15 गाढवांना चा-या पाण्याची व्यवस्था करुन त्यांना जिवनदान देण्यात आले आहे. महिन्द्रा बोलेरा पिकअप वाहन किमती अंदाजे 5,00,000/- रुपये व 16 जनावरांची किंमत अंदाजे 3,10,000/- रुपये जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पोउपनि आनंद बिचेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिन्द्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. AP-39-UB-0426 चे चालक, मालक व त्यास मदत करणारे इतर आरोपीतांविरुध्द गु.र.नं. 490/2022 कलम 279 भादंवि सहकलम 2(2)(E) प्रा. कु. वागणुक अधिनियम 1960, कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोना/1230 गव्हाणकर हे करत आहेत गुन्हाचे तपासात सदरचे गाढव हे पुर्णा येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने व गाढवांचे मालक हजर झाल्याने एका मयत गाढवावर अंत्यसंस्कार करुन उर्वरित 15 गाढवे हे त्यांच्या मालकांना सन्मानपुर्वक परत करण्यात आले आहेत.पुर्णा येथील गाढवांचे मालकांनी भावनिक होऊन नांदेड जिल्हा पोलीसांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सदर कारवाईबाबत पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे,उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा डॉ.सिध्देश्वर भोरे,यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,सपोनि सुरेश थोरात, पोउपनि आनंद विचेवार, सपोउपनि केंद्रे,पोना/ हुमनाबाद, पोना/ गव्हाणकर, पोकों/पवार व कारवाई मधील सहभागी संपुर्ण पथकाचे विशेष कौतूक केले आहे.

80 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.