अवैध सागी कट साईज माल जप्त
किनवट: दिनांक 15 /06/ 2024 रोजी किनवट – गोकुंदा रोडवर गस्त करत असतांना संशयावरून पांढऱ्या रंगाची टाटा इंडिका कार वाहनाचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून आरोपी पळून गेले . टाटा इंडिका कार जवळ जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी कटसाईज नग -21 आढळून आले.आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला हया कार्यवाहीत मा. उपवनसंरक्षक नांदेड श्री.वाबळे साहेब मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. डी.गिरी साहेब मा.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट श्री.पी. एल.राठोड साहेब यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी चिखली श्री .एम.एन.कतुलवार श्री एस. एम. कोम्पलवार श्री एस. एम. यादव वनरक्षक श्री.अनिल फोले , श्री बी. एस. झंपलवाड श्री ओ. एन. शिंदे, श्री व्ही एस मुळे तसेच कर्तव्यदक्ष वाहन चालक श्री. बाळकृष्ण आवले श्री शेख नूर यांचा या कार्यवाहीत सक्रिय सहभाग होता.
जप्त केलेल्या अवैध सागी मालाचा तपशील खालील प्रमाणे नग संख्या 21 घ मी.0.2188 माल किंमत 4616,=00 रुपये टाटा इंडिका कार किंमत अंदाजे 40000=00रुपये जप्त केलेला एकूण मुद्देमाल 44616=00 रुपयाचा आहे.