मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तालुका प्रशासनाच्या वतीने मौजे हाणेगाव येथील हुतात्मा स्मारक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.2.देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथे दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , तहसीलदार राजाभाऊ कदम , गट विकास अधिकारी शेखर देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी गवाले,नायब तहसीलदार संजय नागमवाड, अड प्रितम देशमुख जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड, दिलीप बंदखडके माजी जिल्हा परिषद सदस्य हाणेगाव,कृषी मंडळ अधिकारी टोणे,मरखेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार,वनपाल गेडाम,हाणेगाव ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच मुझीपोदिन चमकुडे,ग्रामविकास अधिकारी बि.जी.उमाटे, गटशिक्षणाधिकारी तोटरे देगलूर, पी आर टोके,धनासुरे एन,आर, बेंजलवार मंडळ अधिकारी , कोंडलवाड तलाठी,फुलसिंग राठोड प्राचार्य इंद्राबाई देशमुख हाणेगाव,गावातील प्रतिष्ठित नागरिक ऍड.वीरभद्र माळगे, बाबुराव पटणे,चंद्रकांत पटणे,व्यंकटराव बत्तीनवार, चंद्रकांत बत्तीनवार,राजीव भाये, विजय वंटगिरे,अशोक खजुरे, हाणेगाव ग्रामपंचायत चे सर्व ग्रामपंचायत सदस्य राहुल सोनकांबळे,आदिजन उपस्थित होते.
यावेळी सर्व स्वातंत्र्यसैनिक यांच्या वारसदारांचा सत्कार करण्यात आला सर्व वारसदारांच्या सत्कारानंतर तीन हुतात्मा च्या नावे वृक्षारोपण करण्यात आले
स्वच्छता अभियान
व विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले तर यावेळी अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशाताई,कै.इंद्राबाई देशमुख ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थिनी विद्यार्थी व जिल्हा परिषद हायस्कूल हाणेगाव चे विद्यार्थी व गावातील पालक विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विनायक संतोष भाये याने सुंदर असं भाषण करून सर्वांचे मने जिंकले
या कार्यक्रमाचे सुरेख आयोजन बी.जी.उमाटे ग्रामविकास अधिकारी हनेगाव बेंजलवार मंडळ अधिकारी हाणेगाव कुंडलवाड तलाठी हनेगाव,कृषी सहाय्यक धनासुरे एन,आर,कदम डी ए कृषी सहाय्यक शिळवणी आदींनी आयोजन केलं होते यावेळी पत्रकार शशिकांत पटणे,महादेव उपे,उमाकांत पंचगले ग्रामपंचायत सदस्य, वसंत आडेकर ग्रामपंचायत सदस्य,मोहसीन मुजावर,बिलाल मुजावर,किशोर आडेकर, फारुख पटेल, सर्व पत्रकार उपस्थित होते