उपेक्षितांना न्याय देणारा महामानव अण्णाभाऊ साठे: डॉ प्रल्हाद लुलेकर
*उदगीर*:दि.2.शिक्षणापेक्षा शहाणपणाला अधिक महत्त्व असते.विचार करणारा माणूस हा श्रेष्ठ असतो.अण्णाभाऊ साठेंना विचार करणारा महापुरुष म्हणून पाहिले पाहिजे.साहित्यातून अण्णाभाऊ समजून घेण्यापेक्षा अण्णाभाऊ साठे समजून घेऊन त्यांचे साहित्य समजून घेतले पाहिजे.वामन दादा कर्डकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर पन्नास गीते लिहिली.वामनदादा अण्णाभाऊंना माझा मोठा भाऊ म्हणत असे.उपेक्षितांना साहित्य क्षेत्रात न्याय देणारा महामानव अण्णाभाऊ होते.
मार्क्स,फुले आंबेडकर यांच्या विचारांचा त्रिवेणी संगम झाल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही.या तिन्ही विचारांचा वारसदार म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे साहित्य होय.अण्णाभाऊंनी सुंदर जीवनाची कल्पना केली.जे पाहिले ते अनुभवले तेच त्यांनी लिहिले.महापुरूषांना देव करू नका.अण्णाभाऊंनी १९४२च्या चळवळीत सहभाग घेतला होता.गरीब माणूस पेटल्याशिवाय समाज परिवर्तन होऊ शकत नाही.
अण्णाभाऊंची १९४२ च्या चळवळीतील भूमिका समजली की,अण्णा भाऊ साठे यांना कोणते स्वातंत्र्य अभिप्रेत होते हे लक्षात येते.वर्ग,जात आणि धर्मांधांचा प्रभाव जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत समाज परिवर्तन होऊ शकत नाही याची जाणीव अण्णाभाऊंना होती असे विचार थोर विचारवंत डॉ प्रल्हाद लुलेकर यांनी शिवाजी महाविद्यालय,उदगीर येथे लसाकम आयोजित विश्वविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य ड्रा.अरविंद नवले हे होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना लसाकम शाखा उदगीरच्या वतीने श्री.बसवराज पाटील नागराळकर यांना राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर श्री दिलीपकुमार गायकवाड,यांना शैक्षणिक,सामाजिक,उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.श्री.अशोक केदासे यांना सामाजिक उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून श्री बालाजी आंदे यांना सामाजिक,उद्योग क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते त्यांचे बंधू श्री रामेश्वर आंदे यांना सन्मानित करण्यात आले तर श्री मच्छिंद्र कांमत यांना सामाजिक, राजकीय,उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार देण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित प्र.प्राचार्य डॉ राजकुमार मस्के,मुख्याध्यापक श्री दिलीप हणमंते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ प्रल्हाद लुलेकर म्हणाले की,कारवार,निपाणी, बेळगाव आदीसह महाराष्ट्र झाला पाहिजे ही इच्छा अण्णाभाऊंची होती.
अण्णाभाऊंनी जगण्यातून भरपूर शिकले त्यातूनच त्यांनी समाजाला विचार दिले त्यांच्या लेखनाची भूमिका स्पष्ट होती.त्यांना समाजातील वास्तव बदलायचे होते.समाजाने आपला इतिहास तपासला पाहिजे.अण्णाभाऊ ब्राह्मणशाहीच्या विरूद्ध ते शेवटपर्यंत लढले. अण्णाभाऊंनी बहुजन समाजातील सर्व जातींना साहित्यात न्याय देण्याचे महनीय कार्य केले.अण्णाभाऊंनी शाहिरी वाड्.मयातून परिवर्तनवादी विचार मांडला.लोकनाटयाची रचना बदलणारा अण्णाभाऊ रचनाकार होते.महापुरूषांच्या जातीकडे,वादाकडे न पहाता विचाराकडे पहा,अण्णाभाऊ या परिवर्तनवादी साहित्यिकाला समजून घेतले पाहिजे,त्यांची साहित्य लेखनातील तळमळ समजून घेतले की,त्यांचे मोठेपण लक्षात येते असे यावेळी त्यांनी मांडले.सत्काराला उत्तर देताना श्री बसवराज पाटील नागराळकर म्हणाले की,एका समाजातील शिकलेली माणसं समाज हितासाठी चळवळ करतात बौध्दिक मेजवानी म्हणून व्याख्यानाचे कार्यक्रम ठेवतात.समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात ही कृतज्ञपणाची पवित्र भावना त्यांच्यामध्ये आहे ही चांगली बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रामकिशन सोनकांबळे,प्राचार्य डॉ सदानंद गोणे, डॉ सुशीलप्रकाश चिमोरे,प्रा.रामभाऊ कांबळे, लसाकमचे अध्यक्ष प्रल्हाद येवरीकर,प्रा.पंडित सूर्यवंशी, प्रा.बिभिषण मद्देवाड,प्रा.संजय बिबिनवरे,श्री.गणेश वाघमारे,प्रा.देविदास गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के यांनी केले तर सूत्रसंचालन प्राचार्य गोविंद भालेराव यांनी केले.उपस्थितांचे आभार लसाकमचे सचिव अॅड विष्णू लांडगे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी उदगीर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते,नागरिक तसेच शहरातील प्राध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.