परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत हे आंदोलनाला सुरुवात
परळी (वार्ताहर) परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली असून या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले असून या मध्ये मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या १) मराठा समाजाचा सरसकट 50 टक्के आतील ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्यात यावा २) महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ३) नुकत्याच जालना जिल्ह्यातील चाराठा अंतरवाली या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलन कर्त्यांवर महिला व आभालवृद्ध यांच्यावर झालेला अमाणूस लाठी चार्ज करणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे ४) कोपर्डी येथील पिढी ताईच्या मारेकरयांना तात्काळ फाशी देण्यात यावी ५) कै अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तरुण उद्योजकांना विनागहानखत न करता तात्काळ आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदठी आंदोलनाला आंदोलन ला सुरुवात झाली असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा चे आंदोलन करते उठणार नाहीत हे मोर्चा सकल मराठा समाज परळीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत .