गुटखा अन्न -औषध व पोलीस अधिकारी यांच्यामुळे महाराष्ट्रातील गुटखा बंदीचा निर्णय ‘सपशेल’ अपयशी
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.महाराष्ट्रातील तरुण मुले व्यसनाधीन होऊ नयेत,म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात गुटखा बंदी केली या गुटखा बंदी ने महाराष्ट्राच्या तिजोरीत येणारा करोडो रुपयांचा महसूल बुडीत असतानाही केवळ समाजहित लक्षात घेऊन गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.गुटखाबंदीच्या निर्णयाने महाराष्ट्रात खरोखरच गुटखा बंद झाला का? असा प्रश्न येतो गुटखाबंदी महाराष्ट्रात असली तरीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुटखा विक्री जोरात सुरु असून,अन्न -औषध व पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेजारील राज्यातून फार मोठया प्रमाणात गुटखा तस्करी करून हा गुटखा महाराष्ट्रात विकल्या जात आहे .
पोलीस आणि अन्न -औषध अधिकाऱ्यांच्या हप्तेखोर कृतीमुळे महाराष्ट्रात खुलेआम गुटखा विक्री होत असून, गुटखाबंदीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीतील महसूल बुडाला असला तरीही पोलीस आणि अधिकारी यांची तिजोरी मात्र भारतच आहे.
शेजारच्या राज्यातून गुटखा विक्रीचे रॅकेट चालत असून या रॅकेट मध्ये पोलीस व अन्न -औषध अधिकारीही सहभागी असतात. याना मिळणाऱ्या प्रचंड हप्त्यामुळे गुटख्याच्या गाडीवर कोणतीच कारवाई केल्या जात नाही. शेजारच्या राज्यातून गुटखा आणून महाराष्ट्रात चढ्या भावाने विक्री होत असल्यामुळे हा काळा बाजार फोफावला असून, दररोज करोडोंची उलाढाल होते.
त्यामुळेच महाराष्ट्रातील खेड्यापासून ते शहरापर्यंत प्रत्येक पानटपरीवर गुटखा उपलब्ध आहे.शासनाने गुटखाबंदी केली असली तरीही याची अंमलबजावणी योग्य होत नसल्यामुळेच,हप्तेखोर पोलीस व अधिकाऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. हप्त्याने मिळणाऱ्या पैशातून महागड्या चारचाकी गाड्या घेतल्या जात आहेत.
मुलांना महागड्या शाळेत लाखोरुपायची फी भरून आपल्या पाल्याचा प्रवेश घेतात, हि भ्रष्ट अधिकारी- कर्मचारी यांचा पगार किती? लाखो रुपयाची फी भारतात कसे? याची कधी चौकशी होईल? हप्ते आणि टक्केवारी येते कसे? हे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी याना माहित असते.
अवैध्य धंदे मटका,गुटखा विक्री, रेती उपसा करणारे,अन्न भेसळ करणारे,यांच्या कडून मिळणारे हप्ते हे सर्व राजकारणी आणि वरिष्ठांच्या मर्जीनेच होते का? गाव पातळीपासून शहरापर्यंत तलाठी, ग्रामसेवक,यांच्या सोबत यांचे अधिकारी साध्या प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी पैसे घेतल्याशिवाय सही करत नाहीत. तसेच प्रत्येक कामात टक्केवारी घेणारे अधिकारी ,कर्मचारी नेता,मंत्री,पदाधिकारी यांच्या एका फोनवर,वर्तमान पत्रात पानभरून जाहिरात व होल्डिंग लावतात.मग भ्रष्टाचार थांबेल कसा? या सर्वच भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करून कार्यवाही केल्यास हप्तेखोरी, अवैध धंदे व गुटखाही बंद होईल.
महाराष्ट्रात तंबाखू मुक्तीचा नारा मोठ्या प्रमाणात दिला जात आहे.सर्वच शाळा,कॉलेज 100% तंबाखूमुक्त करण्यात येत आहेत,सर्वात जास्त शाळा, कॉलेजची विद्यार्थी तंबाखू आणि गुटखा खात आहेत, शाळा-कॉलेज तंबाखूमुक्त होणार कसे ? महाराष्ट्रातल्या प्रत्येक बॉर्डरवर पोलीस चौकी असताना महाराष्ट्रात गुटखा येतोच कसा? नांदेड जिल्ह्यात करोडो रुपयाचा तंबाखूजन्य गुटखा पोलिसांच्या कार्यवाहीत सापडला.पोलिसांनी कार्यवाही केली,तरीपण शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते.हा प्रकार थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सरकारने महाराष्ट्रात गुटखा बंदी केली असली,तरीही या निर्णयाची किती अंमलबजावणी होते.याची चौकशी करणे गरजेचे आहे.
आज पोलीस व अन्न -औषध अधिकारी यांच्या संगनमताने महाराष्ट्रात जो गुटख्याच्या काळाबाजार चालू आहे. त्यावरून गुटख्याच्या बंदीचा निर्णय हा ‘सपशेल’ अपयशी ठरल्याचेच दिसून येते. गुटख्याच्या बंदीमुळे शेजारच्या राज्यातून होणाऱ्या गुठक्यांच्या तस्करीमुळे सीमेलगत पोलीस स्टेशन मिळविण्यासाठी पोलीस अधिकार्यात चढाओढ लागते व प्रचंड प्रमाणात बोलीही लागते. सरकारने महाराष्ट्रात वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी गुटखाबंदीचा निर्णय घेतला असला तरीही पोलीस व अन्न -औषध अधिकाऱ्यांच्या हप्तेखोर, कृतीमुळे सरकारच्या चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसून सरकारने प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई केल्यावरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात गुटखा बंदी होऊ शकते.