भिक्षा मागण्यावरून झाला वाद, तृतीयपंथीयांनी ही ओलांडली हद्द…
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.30.लॉकडाऊन च्या नंतर तृतीयपंथीयावर उपासमारीची वेळ आली असून अनेक तृतीयपंथी रस्त्यावर खुले आम भिक्षा मागत आहेत यातच नायगाव -बिलोली हदवाद निर्माण झाल्याने तृतीयपंथीयांच्या दोन गटात भिक्षा मागण्यावरून वाद निर्माण झाला व तुंबळ हाणामारी झाली यात कांही तृतीयपंथी जखमी झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून जखमी असलेल्या तृतीयपंथीच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात दुसऱ्या तृतीयपंथीयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या भागात भिक्षा मागण्यास का आला या कारणावरून चार तृतीयपंथीयांनी एकाला मारहाण केली त्यानंतर त्या ठिकाणी दोन गटात मारामारी होऊन राधा देवकर,मनीषा,स्वाती गौरी बकश,शिवानी गौरी बकश हे जखमी झाले असून यात तृतीयपंथीच्या हाताचे हाड मोडले व मारहाण केल्या प्रकरणी रामतिर्थ पेालीसांनी चार तृतीयपंथिया विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मनिषा गौरी बकस या तृतीय पंथ्याने दिलेल्या तक्रारीनुसार 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास बिलोली तालुक्यातील जिगळा येथे फरिदा उर्फ फयाज शेख,सलीम शेख उर्फ सलमा,गिता पायल ठाकरे उर्फ सुरे आणि मुद्दसिर बागवान उर्फ फिदा सर्व यांनी मनिषा गौरी बकसला तुम्ही आमच्या भागात भिक्षा मागण्यास का आलात म्हणून वाद घातला.तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
काठीच्या सहाय्याने पाठीत, डोक्यात,मारुन जखमी केले आणि हाताचे हाड मोडले. रामतिर्थ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 15/2022 कलम 325,324,323,504,506 आणि 34 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल केला आहे.सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार आडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.सदरील प्रकार हद्दवाद व असली नकलीचाअसल्याचे बोलले जात आहे.