किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट शहरात आगामी काळात तीन नविन बिअर बार व देशी दारु च्या दुकानांची स्थापना होणार ! शिवाजी नगर भागातून नगरसेविकेचा विरोध

किनवट ता.प्र दि २४ किनवट शहर हे राज्यातील व देशातील इतर शहरांच्या तुलनेत मागासलेले असण्याचे एकमेव कारण म्हणजे येथे तरुणांना उद्योगाकडे व शिक्षणाकडे आकर्षित करण्याकरिता कोणत्याही प्रकारची राजकिय व सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव असल्याने या भागातील युवक हे भरकटले असुन ते वाममार्गाला जात असतांना त्यांना योग्य दिशा देण्या एवजी किनवट शहरात आगामी काळात तीन नविन बिअर बार व देशी दारु च्या दुकानांची स्थापना होणार असल्याने किनवट शहरातील गोरगरीब जनता व युवकांना व्यसनाधिनतेच्या गर्तेत ढकलण्याचे काम सध्या सुरु असुन या प्रक्रीये विरोधात किनवट च्या नगरसेविका खुतिजा बाबु तवर, फेरोज तवर व रिपाई चे विवेक ओंकार यांनी एका निवेदनाव्दारे प्रशासनाकडे निषेध नोंदवला आहे.
नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि, शहरातील काही संवेदनशिल भागात मद्य विक्रीच्या आस्थापनांना स्थापिक करण्याची प्रक्रीया सुरु असुन यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकते त्यामुळे सदर दारु विक्रीच्या आस्थापनांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
शहरातील शिवाजी नगर भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, शाळा आहे, रुग्णालय आहेत, नागरी वस्ती आहे व मागील २५ वर्षापासुन गणेश मंडळाची स्थापना ज्या ठीकाणी केली जाते त्या ठीकाणी दारु विक्रीचे दुकान सुरु करण्याची प्रक्रीया चालु असल्याने नागरीकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे, शहरात शिवाजीनगर , अयप्पास्वामी मंदिर व गोकुंदा रोड व रेल्वेस्टेशन भागात नविन दारु विक्रीचे दुकान स्थापित होणार असल्याचे एकुणच प्रक्रीये अंती निदर्शनास आल्याने त्या त्या भागातील नागरीक हे विरोध नोंदवत आहेत.

415 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.