दोन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी किनवट पोलीस स्टेशन मध्ये पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल
किनवट/ प्रतिनिधी: सोनापूर तालुका किनवट येथील कोलाम आदिवासी जमातीतील दोन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी किनवट पोलीस स्टेशन मध्ये पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, फिर्यादी मुलीची आई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.7.3.2023 रोजी त्यांची मुलगी वय १४ व बहिणीची मुलगी वय 12 वर्षे अशा दोघी त्यांच्या घराच्या जवळच असणाऱ्या आरोपीच्या शेतामधील विहिरीवर पाणी भरण्यास गेल्या असता आरोपीने फिर्यादीच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला. दोन्ही मुली पाणी आणण्यासाठी नेलेले गुंड तेथेच टाकून घरी पळून आल्या.फिर्यादी ही विहिरीवरील गुंड परत आणण्यासाठी गेली असता आरोपी पुन्हा फिर्यादीचे घरासमोर येऊन तिला जातीवाचक शिवीगाळ करून दगड फेकून मारून दमदाटी करून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सुमारास आरोपी पुन्हा फिर्यादीचे घरासमोर जाऊन तुम्ही पोलिसात तक्रार दिली तर तुम्हा नवरा बायकोला पाहून घेतो. तुमच्या मुली शाळेत जातात हे लक्षात ठेवा असे म्हणून दम दिला. अशी तक्रार मुलींच्या आईने पोलीस ठाण्यात दिल्यावरून गुर न 63/ 23 भादवि कलम 354, 336, 504, 506 तसेच पोस्को कायदा कलम 8 ,12 व ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
गुन्ह्याचा पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट हे करीत आहेत.