नागपूर चिंधी बाजार व्यवसाय करणाऱ्याना कायम स्वरूपाची जागा मिळाली लहू सेनेच्या प्रयत्नांना यश
नागपूर: चिंधी बाजार व्यवसाय करणाऱ्याना कायम स्वरूपाची जागा मिळण्याच्या मागणी करीता लहू सेने च्या वतीने 14ते 15 वर्षा पासुन आंदोलन केले आज यश मिळाले . माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.
नागपूर – दि.9 – 04 – 2022ला सकाळी 10-30 वाजता राम मंदिराच्या राम झुल्याचा खाली चिंधिबाजार व्यवसाय करणाऱ्या कायम स्वरूपाचा जागेचे भुमिपुजन माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले .
लहू सेनेच्या वतीने 14ते15 वर्षापुर्वीच्या मागणी ला अखेर यश आले. त्या मागणी करीता लहू सेने कित्येकदा आंदोलन केले.
यावेळी लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे , मुरलीधर रणखाम , रविन्र्द खडसे , गणेश साळवे , अशोक खडसे , प्रविण खडसे, हर्षल दुरूकर , काशीनाथ धुरे , गजानन उमरेडकर , नरेश शेलूकर, विनोद आठवले , बंटी इंगले, संजय जाधव , राजु साळवे, दुर्गेश बावने , सचिन इंगोले , सचिन काळे सर्व लहू सैनी उपस्थित होते .