किनवट/ माहूर मतदार संघात तीन ते साडेतीनशे कोटी चा निधी आणून विकास कामांना सुरुवात केली-आ.भीमराव केराम
किनवट/प्रतिनिधी; गेल्या दोन ते अडीच वर्षाच्या काळात किनवट/ माहूर मतदार संघात तीन ते साडेतीनशे कोटी चा निधी आणून विकास कामांना सुरुवात केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत आमदार भीमराव केराम यांनी दिली.
तीन ते चार महिने माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी किनवट माहूर मतदार संघात लोकांना भेटू शकलो नाही तसेच त्यांच्या अडीच अडीअडचणी कमी फार प्रमाणात सोडवू शकलो नाही. त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. परंतु आता सध्या माझी तब्येत ठीक असल्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी मतदार संघात पुन्हा सक्रिय झाला आहे.
प्रथमतः साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले माहूर येथील माता रेणुका देवी, दत्तप्रभू व अनुसया देवीचे दर्शन घेऊन गुढीपाडवा या शुभ दिनापासून माझ्या कार्याला सुरुवात केली आहे.
किनवट/ माहूर मतदार संघात कोरोना काळात आरोग्याच्या प्रश्नाविषयी जागृतता दाखवत किनवट माहूर तालुक्यात आरोग्य सेवा कमी पडू दिली नाही. यात 17 आरोग्य रुग्ण सेविकेचे वाटप करण्यात आले आहे. तसेच किनवट/माहूर येथे ऑक्सीजन प्लांट उभारणी करण्यात आली. लवकरच सिटीस्कॅन यंत्रणाही कार्यान्वित होणार आहे. तसेच मतदार संघात अनेक रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक गावांत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात मी मतदारसंघात सक्रिय राहून जनतेच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच हे पत्रकार परिषद म्हणून नव्हे तर गेट-टुगेदर म्हणून या कडे आपण पाहू या व मतदारसंघातील अडचणी अडीअडचणी संबंधी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू या यासाठी मी आपणास बोलावले आहे असे ही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे,अनुसूचित जमाती सेल चे जिल्हाअध्यक्ष गोविंद अंकुरवाड , तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार,अनिल तिरमनवार,कराड काका,प्रकाश कुडमेथे,नीलकंठ कातले,संतोष मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.