किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट शहरासह तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार .. शहरातील गंगानगर,नालागडा व मोमीनपूर च्या सखल भागात पैनगंगा नदीचे डब मारलेले पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने गोरगरीब,हातावर पोट असलेल्यांची संसारे झाली उध्वस्त ..

किनवट(आनंद भालेराव): किनवट शहरासह तालुक्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून किनवट शहरातील गंगानगर,नालागडा व मोमीनपूर च्या सखल भागात पैनगंगा नदीचे डब मारलेले पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने गोरगरीब,हातावर पोट असलेल्यांची संसारे उध्वस्त झाली आहे.
या सर्व परिस्थितीवर किनवट चे सहाय्याक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,नगरसेवक जातीने लक्ष ठेऊन आहेत. सर्वजण बाधित क्षेत्रास भेटी देऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत.

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.परंतु जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावत गेल्या तीन दिवसांपासून सतत धुवाधार पाणी पडत असल्याने तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

किनवट शहरालगत किनवट-उमरखेड रस्त्यावर पैनगंगा नदीवरील पुलावरून तीन ते चार फूट पाणी जात आहे. नदीपात्रात पाणी मावत नसल्याने आजूबाजूला पाणी पसरले आहे.
किनवट शहरात पैनगंगा तीरी साईबाबा मंदिर,गजानन महाराज मंदिर,स्वामी समर्थ मंदिर,महादेव मंदिर,मनसब योग साधना केंद्र पाण्याखाली गेले आहेत. तर साईबाबा मंदिराला लागूनच असलेल्या गोशाळेत पाणी शिरल्याने मुक्या जनावरांना काही समाजसेवकांनी पुढाकार देऊन गोशाळेत मुक्या प्राण्यांना जीवदान दिले.
किनवट-दाराटी -उमरखेड रस्ता बंद आहे. पैनगंगा नदीचे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या ठिकाणी पोलीस निरीक्षक साळुंके यांच्यात मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
मोमीनपूरा ,गंगानगर येथील सखल भागातील घरात नदीचे पाणी शिरल्याने गोरगरिबांची व हातावर पोट असणाऱ्या मजुरांची संसारे उध्वस्त झाली आहेत.
या पूरग्रस्त भागातील झालेल्या नुकसानीची पहाणी व पंचनामे करून प्रशासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी पूरग्रस्त नागरिक करीत आहेत.

नागरपालिका द्वारे नाल्या लगतच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच जीवित व वित्तीय हानी होऊ नये याची खबरदारी म्हणून तात्पुरती सुरक्षित निवारे निर्माण करण्यात आली आहेत. मोमीनपपुरा साठी जवाहर उलूम उर्दु शाळा , रामनगर साठी राममंदिर,गंगानगर साठी कॉस्मा पोलिटन विद्यालय,बाबासाहेब मुखरे विद्यालय गंगासागर,इस्लामपुरा गंगानगर साठी जि प शाळा रेल्वे स्टेशन,इस्लामपुरा इस्लामपुरा मंगलकार्यालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
गोकुंदा येथील वॉर्ड क्रमांक 1 मध्येही पुराचे पाणी अनेकांच्या घरात जाऊन प्रचंड मोठे नुकसान झाले असल्याचे या भागातील ग्रामपंचायत सदस्य मनीषा चौधरी व माकप चे युवानेते श्री जनार्धन काळे यांनी सांगितले.येथील ग्रामसेवक रावले, ग्रामपंचायत सदस्य शेख सलीम,जी प सदस्य प्रतिनिधी प्रवीण म्याकलवर,शेख परवीन मॅडम,दर्शनवाड,पत्रकार आनंद भालेराव यांनी भेट देऊन आढावा घेतला.

81 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.