किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

रामस्वरूप मडावी यांचा ‘काहूर’ काव्यसंग्रह आदिवासी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार -प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर

किनवट : आदिवासी समाजाला गौरवशाली इतिहास आहे. अभ्यासून तो आपल्या पिढीसमोर आपण आणला पाहिजे. तसेच आपलं दुःख , वेदना व समस्या साहित्यातून समाजासमोर आल्या पाहिजेत . म्हणूनच रामस्वरूप मडावी यांचा ‘काहूर ‘ हा काव्यसंग्रह आदिवासी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे. असे प्रतिपादन तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल मधील संत तुकाराम महाराज सभागृहात रामस्वरूप लक्ष्‍मण मडावी यांच्या ‘ काहूर’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक , नामांतर शहीद पुत्र तथा महावितरण नाशिकचे उप कार्यकारी अभियंता डॉ. अभियंता विवेक मवाडे, महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऍड. मुकुंदराज पाटील, मुख्याध्यापक मोहन जाधव, निवृत्त पोस्ट मास्तर दौलतराव कोवे व कवि रामस्वरूप मडावी, पुष्पा मडावी हे मंचावर उपस्थित होते.
प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. प्रारंभी महानायकांच्या प्रतिमा पूजनानंतर वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी स्वागत गीत गाईले.
याप्रसंगी बोलतांना अभियंता विवेक मवाडे म्हणाले की, मराठी साहित्यात विविध साहित्य प्रवाह आपली कैफियत मांडत पुढे आले आहेत. आंबेडकरवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विद्रोही साहित्य, जनवादी, स्त्रीवादी श्रमिकांचे साहित्य असे विविध साहित्य प्रकार आपल्या समस्या, विधानांना मांडण्यासाठी निर्माण झाले आहेत. यामुळेच विद्रोह आणि हक्काची भाषा ही साहित्यातून उमटते. रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहातून जीवनाच्या व समाज व्यवस्थेच्या विविध अगांना साकारलं आहे. दुःख , दैन्य , दारिद्र्य व अज्ञान यामुळे विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींच्या हातावर मीठ भाकरी भेटणं मुश्कील असतं. ह्याच भाकरीचा संघर्ष त्यांनी आपल्या काव्यसंग्रहातून रेखाटला आहे.
यावेळी ऍड . मुकूंदराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. किशन धुर्वे यांनी गोंडी भाषेत विद्रोही कविता सादर केली. अध्यक्षीय समारोप करतांना गट शिक्षणाधिकारी महामुने म्हणाले की, कविता शिकवितांना रामस्वरूप मडावी यांनीच साहित्य निर्मिती केली. अशा धडपडणाऱ्या सर्व शिक्षकांचं साहित्य आम्ही तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत पोहचवू. आदिम इतिहास ताजा करणाऱ्या त्यांच्या लेखनीस सलाम.
कार्यक्रमास गोरबंजारा साहित्यिक प्रा. डाॅ. वसंत राठोड, केंद्रप्रमुख रामा उईके, विजय मडावी, शिवाजी खुडे, सुभाष बोड्डेवार, देविदास वंजारे, जगदीश कोमरवार, साई नेम्माणीवार, राजा तामगाडगे, राजेश पाटील, विकास कोवे, वर्षाराणी कोवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल येरेकार , समशेर खान , रुपेश मुनेशर , नवनाथ कोरनुळे , रमेश राठोड , प्रदीप कुडमेते, राहूल तामगाडगे , दीपाली मडावी , ओमकार मडावी आदिंनी परिश्रम घेतले.

456 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.