चव्हाण परिवाराची तिसरी पिढी राजकारणात,नारायण जाधव सारख्या अनेक सामान्य युवकाला संधी दिल्याने कार्यकर्त्याच्या अपेक्षा उंचावल्या
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.22.नायगाव नगर पंचायत निवडणुकीत भाजपा चा सुफडा साफ झाल्या नंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव यांच्या प्रगल्भ नेतृत्वा पुढे भाजपा सह सारेच थीटे पडले.या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देत नगर पंचायत च्या सभागृहात जाण्याची संधी उपलब्द करून देवून पक्षासी आणी वाड्यासी निष्ठा ठेवणाऱ्याला बहुमान करण्यात आला.
मतदारांनी विरोधकाचा सफाया करत चव्हाण परिवाराला दिलेला हा बहूमाणाच्या कौल पहाता नगर वासीयांना वसंतराव विकासाचे कोणते गिफ्ट देतात ते पहावयास मिळणार आहे.
या बरोबरच चव्हाण परिवाराच्या तिसर्या पिढीने पंकज हानंमतराव चव्हाण यांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करत जोरदार एण्ट्री केली.विशेष म्हणजे ते शहरात सर्वाधीक ४६५ मताच्या लीड घेवुन विजयी झाले आहेत.
या पाठोपाठ माजी आमदार पुत्र प्रा.रवींद चव्हाण यांना विधान सभा उमेदवार म्हणून सोशेल मिडिया च्या माध्यमातून प्रजेन्ट केले जात आहे. काँगेस चे तिन बिन विरोध व चौदा नगर शेवक बहूमतानी विजयी झाले. यात उप नगराध्यक्ष विजय चव्हाण, गटनेते सुधाकर शिंदे, माजी नगराध्यक्ष शरद भालेराव, विजय भालेराव व हानमंत बोईनवाड हे पाच वगळता बारा नव्या चेहऱ्याना संधी देण्यात आली.
यात श्रीमती गीता नारायण जाधव या सामान्य आणि तळमळीने कामकरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलेला संधी लक्ष वाधनारी ठरली.प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा व सर्वांच्या सुखा दुखात सहभागी होणारा नारायण हा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, कोणतीच अपेक्षा न ठेवता कार्य करणार्याला नगर सेवक म्हणून वसंतराव चव्हाण यांनी दिलेली संधी ईतर कार्यकर्त्याच्या अपेक्षा व निष्ठा वाढवणारी ठरणार आहे.
नारायण जाधव सारखीच अनेकांना सभा गृहात नगरशेवक म्हणून दिलेली संधी न्याय देणारी आणी चर्चेचा विषय ठरली.ही बाब पक्षनिरीक्षक विजय येवनकर व माजी महापौर अब्दुल सत्तार यांना कळाली, त्या वेळेस ते ही अचंबित झाले एवढा सामान्य कार्यकर्ता बिनविरोध कसा निघाला असा सवाल करत त्यांनी केशवराव चव्हाण व विजय चव्हाण यांचे तोडंभर कौतुक केले.
नायगाव शहराच्या विकासाची जवाबदारी ग्राम पंचायत असताना सलग दहा वर्ष तालुका संघाचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण यांच्या कडे सरपंच पदाच्या माध्यमातून सोपवण्यात आली होती.सन २०१५ मध्ये नगर पंचायत अस्तित्वात आल्या नंतर या नगर पंचायतीचे सुत्र बाजार समितीचे माजी सभापती विजय चव्हाण यांच्या कडे सोपवण्यात आली.त्यानी नगर पंचायत अस्तित्वात आल्या नंतर शहराच्या विकासाची जवाबदारी पार पाडली शौचालय,पंत प्रधान घरकुल,स्वच्छता,घण कचरा व्यवस्थापन,टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रस्ते नाल्याची सोय केली.
पाच वर्षाच्या कार्यकाळ यशस्वी पार पडल्या नंतर विजय चव्हाण यांना परत दुसर्यांदा नगर पंचायतचा कारभार सांभाळण्याची व विकास करण्याची संधी देण्यात आली आसल्याने त्यांच्या खांद्यावर नायगाव शहराच्या विकासाची मोठी जवाबदारी आली आहे.नांदेड हैद्राबाद महामार्गावर असलेल्या नायगाव शहर हे विकास विमुख शहर आहे. या गावच्या विकासाची निव माजी आ.कै बळवंतराव चव्हाण यांनी ठेवली.
ग्रामपंचायत असतानाही तालुका पातळीवर असलेली तहसील व पंचायत समिती वगळता सर्व कार्यालय नायगाव शहरात दुर दृष्टी कोण ठेवून आणण्यात त्याना यश आले होते. त्यांचा समर्थ वारसा त्यांचे पुत्र वसंतराव चव्हाण यांनी ग्रामपंचायत सरपंच पदा पासून सभाळला.ते जि.प.सदस्य व विधान परिषद ते दोन वेळा निवडुन येवून विधान सभेत पोहंचले.नायगाव विधान सभा मतदार संघांच्या निर्मीती नंतर ते या मतदार संघाचे पहिले आमदार आहेत.
आता ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदावर विराजमान आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नायगाव शहराने सर्व व्यापक विकास केला बाजार पेठेचा सर्व दुर लौकीक मागील चार दक्षका पासून टिकून आहे.तो वाढविण्याचा आधुनिक विकासाच्या माध्यमातून विकासाची कास धरण्याची जवाबदारी आता विजय चव्हाण यांच्या वर आहे.विकास हा कधीही न संपणारा विषय आहे. तो कसा करायचा तो जवाबदारी दिलेल्या मंडळी ने ठरवायचे असते.
सर्व सामान्य नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी,रस्ते,नाल्या,आरोग्य सुविधा न नगर पंचायती मधिल कामे वेळेवर व विना अडचण झाली की ते समाधानी रहातात.सत्तेवर बसलेल्या मंडळी कडून जनतेची तेवढीच अपेक्षा असते.