गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वॉर्डात पथदिवे तात्काळ लावण्यात यावे – आशिष शेळके अध्यक्ष (प्रेस संपादक व पत्रकार सेवसंघ)
किनवट/प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांची भेट देऊन यांच्या पथदिवे व इतर समस्या बाबत सविस्तर चर्चा केली.
सविस्तर वृत्त असे की, बऱ्याच महिन्यांपासून गोकुंदा ग्रामपंचायत मधील बऱ्याच वार्ड मध्ये पथदिवे व खांबावरचे बल्ब खराब झाले आहेत त्यामुळे सर्व वार्ड मधील नागरिकांमध्ये रात्री ला भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खांबावरती पथदिवे व बल्ब नसल्या कारणाने चोरीचे व लुटमारीचे प्रमाण ही वाढले आहेत, तसचे काही विद्यार्थ्यांना देखील कोचिंग क्लासेस मधुन येताना अंधारातच ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे या अंधारामुळे पालक व विद्यार्थी दोघेही त्रस्त आहेत. तसेच महिला व लहान मुले-मुली दुर्गा उत्सव निमित्त गर्भा खेळण्यासाठी घरापासून दुर दुर्गा देवी व शारदा देवीकडे जात असतात, तेव्हा गर्भा खेळुन परत येताना आपापल्या वार्ड मध्ये सर्वीकडे अंधार असल्या कारणाने महिला व लहान मुले-मुली भितीमय परीस्थितीत घरी येत आहेत. या सर्व कारणांमुळे काही वाईट प्रकरण घडण्याच्या आधी सर्व वार्ड मध्ये लवकरात लवकर पथदिवे व खांबावरचे बल्ब लावण्यात यावी ,तसेच नाल्या साफसफाई व कचरा गाडी च्या समस्यां, नाल्या कचऱ्यांनी व पाण्यांनी तुडुंब भरल्या आहेत. तसेच काही वार्ड मध्ये भरपुर कचरा व घाणीचे ढीग तयार झाले आहेत त्यामुळे वार्ड मध्ये दुर्गंधी, मच्छरांचे व रोगराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कचरा गाडी व नाली सफासफाई कामगारांना दर हफ्त्यांला सर्व वार्ड मध्ये पाठवावे मागणी जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी ग्रामसेवक प्रविन रावळे यांच्याकडे केली आहे.
येत्या आठ सर्व समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करीन असे आश्र्वासन दिले. कर्तव्यदक्ष ग्रामसेवक ग्रामसेवक प्रविन रावळे यांनी दिले.
समस्या खरंच आठ दिवसांत सुटणार का ?यांकडे गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.