महिलांनी स्वावलंबी होऊन सक्षम बनने काळाची गरज – तालुकाध्यक्षा सौ.सीमा साळुंखे
येवती:- (ता.कराड ,जिल्हा सातारा)- ग्रामीण भागातील महिलांना शासकीय योजनांची माहिती वेळेवर मिळत नसल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून सर्व शासकीय माहिती आम्ही तुम्हाला देऊन शासकीय योजना तुमच्यापर्यंत घेऊन येऊन त्याचा पुरेपूर लाभ घेऊन महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या कराड तालुका अध्यक्ष सौ. सीमा साळुंखे यांनी केले त्या येवती (ता.कराड) ठिकाणी महिलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
सदर बैठकीस ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुढे बोलताना सौ. साळुंखे म्हणाल्या शिक्षण कमी असलं तरी चालेल पण बचत गटाच्या व संघटनेच्या माध्यमातून महिलांनी उद्योग करताना धाडसानं पुढे येणे गरजेचे आहे.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कराड तालुक्याचे अध्यक्ष माननीय शंकरराव चव्हाण होते तर प्रमुख उपस्थितीत पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार समितीचे अध्यक्ष मा प्राचार्य बाळासाहेब साठे , पुरोगामी संघर्ष परिषदेचे सातारा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य माननीय सुभाषराव साळुंखे उपस्थित होते.
यावेळी सारिका सोनलणे,मनिषा सोनवणे,स्वाती कांबळे, नंदा कांबळे,सुनंदा कांबळे,अंकीता कांबळे,शोभा कांबळे, लता सोनवणे,तेजस्वीनी सरोटे,नानूबाई थोरात, भिमाबाई कांबळे इ.महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शेवटी आभार सारिका सोनवणे यांनी मानले.