शेती मालावरील वायदेबंदी न उठवील्यास २३ जानेवारी २०२२ पासून सेबीच्या कार्यालया समोर बेमुदत आंदोलन
नांदेड प्रतिनिधी:-०९ जाने
शेतीमालावरील वायदेबंदी न उठवील्यास मुंबई येथील सेबीच्या कार्यालया समोर आंदोलनात संपुर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटना सहभागी होतील अशा आशयाचे निवेदन पत्र मा. पंतप्रधान भारत सरकार दिल्ली यांना मा.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत देण्यात येत आहे .
सविस्तर वृत असे कि २० डिसेंबर २०२२ रोजी सरकार द्वारे एक आदेश काढण्यात आला तो शेतकरी, व्यापारी , उद्योजक यांच्यावर अन्यायकारक व नुकसान कारक आहे म्हणुन स्वंतत्र भारत पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकरी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु आहे हा आदेश शेतकऱ्यांच्या हिताचा नाही तो मारक आहे असे शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीच्या वतीने कळवण्यात आले .
सदरील निवेदनावर गुणवंत पा. हंगरेकर ( माजी प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना), अॅड धोंडीबा पवार जिल्हाध्यक्ष स्वंतत्र भारत पार्टी), शिवाजीराव शिंदे ( शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष) आर. पी. कदम( उपाध्यक्ष शेतकरी संघटना), माधव शिंदीकर उपाध्यक्ष स्व. भा. पा.), व्यंकटराव वडजे, विठ्ठलरेड्डी पुल्लागोर, लिंगोजी शिंदे, शिवराज शिंदे, मोहन गुडमलवार, अभी. नरसा रेड्डी याल्लावार, गोवीदराव लोढे, रामलीसन कदम, बाबुराव चव्हाण, वसंत जवादवार, रामराव कोंढे, गणेश कदम, शिवराज थडीसावळेकर, शिवाजी टेंभुर्णीकर, भीमराव हसाळीकर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.