महसुल प्रशासन के.टी. कंपनीच्या दबावा मुळे गप कां? कुंडलवाडी ते धर्माबाद बासर राज्य मार्गावरील प्रकार कोट्यावधीचा शासनाचा महसुल बुडाला
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.14.जिल्यात होत असलेल्या कल्यान टोल इन्मास्ट्रचर कंपनीने नियम धाब्यावर ठेवून गट नं. 165 (ब)लक्ष्मीबाई नरसिंग तोडरोड यांच्या शेतशिवारातील उत्खनन केल्याने कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कुंडलवाडी ते धर्माबाद बासर या राज्यमार्गाचे काम सुरु आहे. यासाठी एका कंपनीने रस्ते कामासाठी मुरुम व मातीचे ठिकठिकाणी उत्खनन केले आहे.
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी ते धर्माबाद बासर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात वापरण्यात आलेल्या अवैध मुरुमाच्या उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.शासनाच्या नियमाचे उल्लंघन करीत क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन करीत आहेत.यामुळे महसुल प्रशासन कंपनीच्या दबावा खाली आहेका असा सवाल होत आहे
सदर कल्यान टोल इन्मास्ट्रचर कंपनीने नियम धाब्यावर ठेवून गट.नं.165 (ब)लक्ष्मीबाई नरसिंग तोडरोड यांच्या शेतशिवारातील उत्खनन केल्याने कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे. कुंडलवाडी ते धर्माबाद बासर या राज्यमार्गाचे काम सुरु आहे.यासाठी कल्यान टोल इन्मास्ट्रचर कंपनीने रस्त्याच्या कामासाठी मुरुम व मातीचे ठिकठिकाणी उत्खनन केले आहे.उत्खनन केला असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.
शासनाची मुरूमाची परवानगी फक्त 500 ब्रास व उत्खनन हजारो ब्रास केली जात आहे. शासकीय परवानगीपेक्षा खोदकाम अधिक केल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बिलोली तालुक्यातील अर्जापुर, थडीसावळी,कोंडलापुर येथील जास्तीचे उत्खनन झाले आहे.या सर्व प्रकरणात दोषी असलेल्या कंपनीवर कारवाईची मागणी होत आहे.या प्रकरणात उपजिल्हा अधिकारी सचिन गिरी व तहसिलदार श्रीकांत निळे यांनी काय कारवाई करतील याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.