*रोहयो जॉबकार्ड व कामाच्या मागणी करीता १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निदर्शने व घेराव आंदोलन*
नांदेड: जिल्ह्यातील अनेक क वर्ग नगर परिषद
व पंचायत मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही जॉब कार्ड देण्यास प्रशासनाच्या वतीने टाळाटाळ करण्यात येत असून जिल्ह्यातील हजारो कामगार महिला – पुरुष हे कामापासुन वंचीत आहेत.
तेंव्हा तातडीने जॉब कार्ड देऊन काम द्या आणी केरळ च्या धर्तीवर रु ६००/- रुपये रोजाप्रमाणे वेतन द्या , नांदेड,अर्धापूर,मुदखेड,भोकर, हिमायतनगर, हदगाव,धर्माबाद, बिलोली,मुखेड,किनवट,माहूर व इतर ठिकाणी जॉब कार्ड करिता मागणी नोंदविणे व कार्ड वाटप मोहीम सुरू करणे. ज्या कामगारांनी मागणी केलेली आहे अशांना तातडीने जॉबकार्ड देने अन्यथा बेरोजगार भत्ता देने,नांदेड जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजने अंतर्गत कामे काढा,जेणेकरून कामगार स्थलांतरीत होण्यास आळा बसेल,गरीब,अल्पभूधारक, मजूर,निराधार, दिव्यान्ग व इतर कुटुंबांचा दारिद्र्य रेषेचा सर्वे करून त्यांना पिवळे रेशन कार्ड द्या,बेघर जनतेस घरकुलाचे वाटप करा,ज्यांना जागा नाही त्यांना जागा देऊन घरकुलाचा लाभ द्या, गायरान व इतर जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून त्यांना मालकी हक्क द्या, कंत्राटी कामगारांचे वेतन बँक खाते ( डीबीटी) द्वारे देण्यात यावे जे देनार नाहीत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा,वृद्ध तसेच निराधार यांच्या पेमेंट मध्ये वाढ करण्यात यावी.
या व इतर मागण्याकरिता होणाऱ्या घेराव आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व कामगार व जनवादी चळवळीचे नेते कॉ.विजय गाभने, सिटूच्या राज्यसचिव व जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार, सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड हे करतील.
*सदरील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे जिल्हा सह आयुक्त यांना घेराव आंदोलन करण्यात येणार आहे* तरी कामगारांनीं १४ मार्च रोज गुरुवार रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जमा व्हावे.
असे आवाहन जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने, कॉ.दिगांबर काळे,कॉ.दिलीप पोतरे,कॉ.प्रल्हाद चव्हाण,कॉ. कालिदास सोनूले,कॉ. जनार्दन काळे,कॉ शिला ठाकूर, कॉ. लता गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.सुंदरबाई वाहुळकर,कॉ. श्याम सरोदे, कॉ.जय गायकवाड आदींनी केले आहे.
अशी माहिती सीटचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.
=====