किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट येथील एका एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या

किनवट /(प्रतिनिधी):
किनवट आगारातील वाहक पदावर कार्यरत असलेले बी एन सदावर्ते यांनी आज सकाळी नांदेड येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ५७ वर्षाचे होते. किनवट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा हा पहिली आत्महत्या असून नांदेड विभागातून दुसरी आत्महत्या आहे.ते फेब्रुवारी २०२२ मध्ये एसटी सेवेतून निवृत्त होणार होते. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा चालू आहे. दरम्यान एसटी सेवा बंद असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेतून जावे लागत आहे. परिणामी आपल्या कुटुंबाचा गाडा कसा हाकलायचा याचा तान व नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिविल हॉस्पिटल नांदेड येथे दाखल करण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून ,जावई असा परिवार आहे. दरम्यान सदर आत्महत्येबाबत एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे. किनवट आगारातून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

1,111 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.