केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात..जिल्हा कचेरी समोर लोकस्वराज्य संघटनेकडुन लक्षवेधी मुंडण आंदोलन.
जिल्हा /प्रतिनिधी :- लोकस्वराज्य आंदोलन नांदेड उत्तर व दक्षिण जिल्हा कमिटी आयोजित लक्षवेधी मुंडण आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णया विरोधात आणि विविध प्रकारच्या मागण्या संदर्भात दिनांक २२डिसेंबर २०२३ रोजी शुक्रवारी दुपारी ठिक अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा नेतृत्वाखाली एक अनोखे आंदोलन तथा लक्षवेधी आंदोलन केले आहे. यामध्ये अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आपल्या डोक्याचे केस कापुन राज्य सरकार व केंद्र सरकारने सर्वसामान्य जनता,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी,अल्पसंख्यांक भटक्या विमुक्त जनजाती संदर्भात मागील काळात घेतलेल्या जनविरोधी निर्णयाविरोधात केलेले कायदे व घेतलेले निर्णय रद्द करण्यात यावे.तसेच या राज्य शासन व केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मुंडण आंदोलन करण्यात येत असल्याचे,आपल्या निवेदनामध्ये सांगितले आहे.या मुंडण आंदोलनामध्ये विविध मागण्या केल्या आहेत.त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा व मनपा शाळा खाजगी कंपनीला चालवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा.ईव्हीएम मशीन ऐवजी बॉयलेट पेपरवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्या.नांदेड जिल्ह्यात व शहरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले खाजगी शिकवणी वर्ग त्वरित बंद करण्यात यावे.देशातील मंदिराकडे असलेले विविध स्थावर-जंगम मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे.राज्यातील सरकारी नोकरीचे खाजगीकरण रद्द करावे.देशातील बँकाचे राष्ट्रीयकरण करावे.एससी, एसटी,ओबीसी,अल्पसंख्यांक प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांना विना तारण,बिनाव्याजी २५ लाख रुपयापर्यंत त्वरित कर्ज देण्यात यावे.अनुसूचित जाती प्रवर्गाचे अबकड आरक्षण वर्गीकरण त्वरित करण्यात यावे.तसेच बार्टींच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्यात यावी.तर डॉ.साठे आर्थिक विकास महामंडळाना लोकसंख्येच्या प्रमाणात एक हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल त्वरित निधी मंजुर करण्यात यावा.मुंबई विद्यापीठास डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नाव त्वरित देण्यात यावे.जिल्ह्यात व खेडेगावात मागासवर्गीय वस्तीमध्ये अवैध देशी दारु व विदेशी दारु विक्री करणाऱ्या लोकांना,अभय देणाऱ्या संबंधित पोलीस स्टेशनच्या बीट जमादार व सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचीअवैध दारु विक्रीवर कारवाई नकरणाऱ्या संबंधितांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ अवैध दारु व अवैध वाहतुकीवर बंदी करण्यात यावी.असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर संघटना प्रमुख प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबदादा पवार नायगाव बा.,संजय खानजोडे हदगाव,शेषेराव रोडे सर चिफ कंमाडर एलएसए संरक्षण युनिट महाराष्ट्र,दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास सूर्यवंशी,जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तरचे माणिक कांबळे बारडकर,धोंडोपंत बनसोडे,गंगाधर गायकवाड निमटेककर,पीजी केदारे,साहेबराव गव्हाणकर,जिजोंरे जामगावकर, गायकवाड मंडाळेकर,सदानंद ऐरणकर तालुकाध्यक्ष,दयानंद गायकवाड कोळीकर,श्रीकांत वाघमारे कोहळीकर,रामदास जळपते पोटेकर तालुका सचिव,माधव जळपते,बबन जळपते,मंगेश राऊत,साईनाथ जळपते आदी जणांच्या शेकडो स्वाक्षऱ्या आहेत. मुंडण आंदोलन यावेळी लक्षवेधी ठरले आहे.