जवाब दो आंदोलनासाठी चंद्रपूरहून जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते मुंबईस रवाना
जिवती -20- सकल मातंग समाज आयोजित दि 22 फेब्रुवारी 2023 ला आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या ‘जवाब दो’ आंदोलनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते दिनांक 21 फेब्रू 2023 ला लहुजी ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात झालेल्या अनेक आंदोलनापैकी मातंग समाजाचे हे आंदोलन ऐतिहासिक असेल असे आंदोलनाचे राज्य समन्वयक डॉ अंकुश गोतावळे यांनी सांगितले आहे.मातंग समाजाच्या अनेक रास्त मागण्या घेऊन तसेच अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण व बार्टी च्या धर्तीवर आर्टी (डॉ अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट )या प्रमुख मागण्यासाठी विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यातून खासकरून चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांचे अनेक कार्यकर्ते डॉ अंकुश गोतावळे, श्री राजु येले, प्रा. सुग्रीव गोतावळे, श्री दत्ताजी गायकवाड, श्री विजयकुमार कांबळे,श्री केशव भालेराव, श्री पंढरी गायकवाड, श्री. भानुदास जाधव, श्री पांडुरंग भालेराव, देविदास कांबळे श्री. बा. रा. वाघमारे, श्री अनिल बसवंते, श्री. संजय भालेराव, श्री. अंबादास गोतावळे आनंद पवार यांच्या नेतृत्वात रवाना होत आहेत.