जळकोट तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई तात्काळ द्यावी- महाराष्ट्नवनिर्माण सेना
जळकोट:- गोपाळ केसाळे
तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनानुसार गेले १० ते १२ दिवस जळकोट तालुका सह सदर संपूर्ण मराठवाड्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे शेतकरी आज हाताश होऊन महाराष्ट्र शासनाकडे आशेने पाहत आहे पण अद्याप तरी शेतकऱ्यांना शासन उदासीन दिसत आहे यामुळे यापूर्वी सुचित केल्यानुसार जळकोट तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हक्टरी सरसकट 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी या प्रमुख मागणीसाठी व शासनाला जाण आण्यासाठी आज दिनांक महाराष्ट्र निर्माण सेना जळकोट च्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले असून या उपरोक्त ही महाराष्ट्र शासन जागे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी हित जपण्यासाठी तीव्र आंदोलन हाती घेईल त्याप्रसंगी शेतकरी सेना तालुकाध्यक्ष महेश देशमुख, शहराध्यक्ष विरभद्र धुळशेट्टे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष शुभम चंदनशिवे, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष गजानन पदमपल्ले, विभाग प्रमुख (वांजरवाडा) ऋषिकेश भोंग तसेच महाराष्ट्र सैनिक सौरभ भोंग, चंद्रकांत शेवटे, सौरभ कापसे, सोमनाथ छत्रपती बबन परीट, वैभव गुरमे, योगेश जारीकोटे, प्रशांत पाटील, चंद्रकांत देवकते, अहमद शेख, केदारे एकाळे,गोपीनाथ ठाकूर, जानापुरे दयानंद, बसवराज थोटे, गणेश चिखले, अक्षय काळे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते