रेल्वे अर्थ संकल्पात धर्माबाद ला भोपळा..रमेश चंद्र तिवारी
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.जिल्ह्यातील धर्माबाद शहरात कित्येक वर्षे पासून ओवरब्रीज ची मागणी प्रलंबित असताना पुन्हा एकदा मोदी सरकारने व खासदार चिखली करानी दुर्लक्ष केले आहे धर्माबाद ला वारंवार दुर्लक्ष होत असल्याने शहरात खासदार चिखली कराच्या प्रती प्रचंड नाराजी पसरली आहे. निवडणूकीच्या आधी विकासाची गंगा धर्माबाद हुन सुरू करण्याचा गप्पा खासदारांनी बोलल्या होत्या प्रत्यक्षात धर्माबाद ला भोपळा निधी दिला कित्येक वर्षे पासून सुपरफास्ट रेल्वे ला थांबा असो कि रायलसीमा नांदेड हुन सोडण्याची मागणी असो कि नांदेड हुन सकाळी 8.30 ची देवगिरी एक्सप्रेस गेल्यावर दुपारी 1.30 वाजे पर्यंत कोणत्याही प्रकारची रेल्वे धर्माबाद ला नाही देवगिरी एक्सप्रेस ला तर प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तो पण अपमानास्पद वागणूक मिळत आहे तिकीट असून सुद्धा जागा भेट त नाही कारण सर्व सामान्य प्रवाशांना दोनच डब्बे उपलब्ध असतात ह्या आणि अशा कितीतरी समस्या ना सर्व सामान्य प्रवाशांना दररोज सामोरे जावे लागते पण हया वरिल समस्या खासदार साहेबांना माहिती देण्यात आले होते पण साहेबांनी धर्माबाद च्या रेल्वे समस्या ना दुर्लक्ष केले आहे आणि रेल्वे सल्लागार समिती वर अशा लोकांना पाठवले की त्यांच्या गावात रेल्वे स्थानक नाही त्यांना रेल्वे च केंव्हाच काम पडत नाही ते रेल्वे बद्दल काय समस्या मांडणार खासदार साहेब पण लोहा कंधार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे त्याना रेल्वे च्या समस्या अवगत नाहीत कि धर्माबाद ला जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत तरी परत एकदा आम्ही मोदी सरकार व खासदार प्रताप राव पाटील चिखली कर साहेब यांना नम्र निवेदन करत आहे कि खासदार साहेबांनी विशेष लक्ष देउन धर्माबाद च्या रेल्वे च्या समस्या मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार कडून निधी उपलब्ध करून घ्यावा