किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

महाराष्ट्रामध्ये एकमेव ग्रामीण रुग्णालय वाढवणा येथे मंजुर* *रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कर्मचाऱ्यांनी काम करावे..माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे

*विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*उदगीर*:दि.23.तालुक्यातील वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे म्हणून येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती या मागणीचा विचार करून अनेक वेळा मंत्रालयामध्ये निकषाच्या अटी टाकून सदर ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता मात्र मी सततचा पाठपुरावा करून महाराष्ट्र मधून आपल्या उदगीर तालुक्यातील वाढवणा येथे एकमेव ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले.

त्याचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आपल्या भागातील रुग्णांची सेवा व्हावी येथील कर्मचारी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करतील असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाच्या भुमीपुजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील,बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, प्रा.श्याम डावळे,माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार चवळे,चंदन पाटील नागरगोजे,
माजी पंचायत समिती सदस्य दत्ता बामणे,वाढवण्याचे सरपंच नागेश थोंटे, मंगरूळच्या सरपंच मेहताब वेग,गुडसूरचे सरपंच बालाजी देमगुंडे,चिमाजी वाडी चे सरपंच नाथराव भंडे,किणीचे सरपंच संतोष बिरादार, हंडरगुळीचे उपसरपंच बालाजी भोसले पाटील,वाढवणा खुर्दचे विकास मुसणे,कल्लूरचे सरपंच निवृत्ती बाजगिरे,रुद्रवाडीचे सरपंच काळे,डाऊळचे सरपंच हणमंत डावळे,खेड्याचे सरपंच भरत कुंडगीर,डोंगरशेळकीचे समाधान कांबळे,गुरधाळचे उपसरपंच नंदकुमार पटणे, हंडरगुळचे सरपंच विजयकुमार अंबेकर,अमजद पठाण, व्यंकटराव पाटील,प्रकाश कोनाळे,माधव कांबळे,उपसरपंच सोनु माळी, ग्राम पंचायत सदस्य अनंत पारसेवार,रहिम कासार,नाना धप्पे,जितेंद्र शिंदे,मनोज सुकणे, विवेक सुकणे,आदी उपस्थित होते.

यावेळी बसवराज पाटील, प्रा.शिवाजी मुळे,
कल्याण पाटील, शाम डावळे, डाॅ.भारकड,शिवप्पा पाटील,उप अभियंता एल.डी. देवकर,आदींनी मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलाताना आमदार संजय बनसोडे यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघात चार आरोग्य केंद्र व एक ग्रामीण रुग्णालय विशेष बाब म्हणून अर्थमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे,यांनी मंजूर केले माझ्या आमदार फंडातून कोरोनाच्या काळात 20 लाख रुपयाची रुग्णवाहिका ग्रामस्थांच्या सेवेत आपल्या आरोग्य केंद्रात देण्यात आली.

आपण काम करत असताना वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामाला महत्त्व देऊन यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा,सिंचन,कृषी, पाणीपुरवठ्याची योजना,गावा गावाला जोडणारे रस्ते,बॅरेजेस, शासकीय कार्यालयाच्या इमारती आदींकडे विशेष लक्ष देवून यासोबतच माझ्या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होईल याकडे विशेष लक्ष दिले.

आपल्या मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग मोठा असल्याने माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात केवळ मी जनतेचा जनसेवा म्हणून काम केले असल्याची ग्वाही यावेळी आ.संजय बनसोडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज मठपती तर आभार विष्णु आलट यांनी मानले.
याप्रसंगी वाढवणा येथील ग्रामस्थ व परिसरातील सरपंच, उपसरपंच,चेअरमन उपस्थित होते.

74 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.