किनवट येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल, डीझल,गॅस,खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या महागाई च्या विरोधात “हल्ला बोल धरणे आंदोलन” संपन्न
किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक किनवट येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल, डीझल,गॅस,खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या महागाई च्या विरोधात घोषणा बाजी करून “हल्ला बोल धरणे आंदोलन” संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी म्हणाले की, 2014 च्या निवडणुकीच्या पूर्वी मोदी सरकार यांनी देशवासियांना विविध आश्वासने दिली होती यात देशात “अच्छे दिन” येणार असल्याचे स्वप्न दाखविण्यात आले होते . तसेच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सांगितले होते . परंतु या मोदी सरकारच्या काळात डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा भडका उडून गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य महिलांना घर चालवण्यासाठी चे आर्थिक बजेट बिघडलेली आहे .त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे हेच “अच्छे दिन” आहेत का? असा सवाल ही किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी यांनी व्यक्त केला.
भारत देशात पुन्हा एकदा “अच्छे दिन” आणण्यासाठी काँग्रेसच पर्याय ठरू शकते तेव्हा काँग्रेस पक्षात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून पुन्हा एकदा काँग्रेससोबत राहून काँग्रेस भक्कम करण्याची गरज आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुर्यकांत रेड्डी, व्यंकटराव नेम्मानीवार,सिराज जिवानी, शेख शहनाज,ईश्वर चव्हाण,आनंद भालेराव, दिलीप पाटील,अभय महाजन,सुभाष बाबु नायक राठोड,शेख.परविन,गिरीषभाऊ नेम्मानीवार,सत्तार खिच्ची, स.अनवर, शे.इब्राहिम शेख चाँद,प्रिती मुनेश्वर,वंदना गादेकर,प्रभाकर नेम्मानीवार,खालीद भाई, वसंत राठोड,माधव खेडकर,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,शे.सरफाराज,जवाद आलम, गंगाधर मुनेश्वर,बिलाल बडगुजर, कुमरेताई, फारुख बाबा,शमशेर खिच्ची व संजय कोत्तुरवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.