चालत्या मोटरसायकल वरुन मोबाईल स्नॅचिंग करणारे दोन गुन्हेगार अटक;चोरीचे (21) मोबाईल व मोटरसायकल असा एकुण 2,94,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त .वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि. 27.रोजी फिर्यादी चंद्रमुनी गंगाराम इंगोले यांनी पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथे येऊन लेखी फिर्याद दिली की, दिनांक 24.10.2022 रोजी मी हिंगोली गेट येथे फटाके आणण्यासाठी गेलो असतांना दोन अनोळखी इसम हे मोटरसायकलवर आले वत्यांनी माझे खिशातील मोबाईल चोरी करीत असतांना मी त्यास पकडले असता त्यांनी मला ओढत नेल्याने माझे कंबरेला व दोन्ही पायाला मुक्का मार लागला. पेट्रोल पंपाच्या बाजुस असलेले लोक आल्याने सदर चोरटयांनी माझा मोबाईल फेकुन तेथुन पळुन गेले आहेत. वगैरे तक्रारीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथे गुन्हा रजीस्टर क्रमांक 374/2022 कलम 393,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करुन गुन्हयाचा तपास पोउपनि आगलावे यांचेकडे दिला.
मा.श्री.श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधिक्षक,नांदेड,मा.श्री.निलेश मोरे,अपर पोलीस नांदेड,मा. श्री.चंद्रसेन देशमुख,उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनांप्रमाणे श्री.जगदीश भंडरवार,पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम,पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकाचे श्री. संजय निलपत्रेवार, पोहेकॉ दत्तराम जाधव,पोना गजानन किडे,पो.ना विजयकुमार नंदे, पोना शरदचंद्र चावरे,पोकॉ संतोष बेलुरोड,पोकॉ व्यंकट गंगलुवार, पोकॉ शेख ईम्रान यांना आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशीत केले.
सदर आदेशाप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीस विचारपूस करुन आरोपीतांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी 01. शैलेश मिलींद नरवाडे,वय 21 वर्षे व्यवसाय खाजगी वाहन चालक राहणार अंबानगर सांगवी नांदेड, 02.राजरत्न मारोती कदम,वय 26 वर्षे व्यवसाय मिस्त्रीकाम राहणार अंबानगर सांगवी नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन हिंगोली गेट ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते बसस्टैंड व चंदासिंघ कॉर्नर याठीकाणी चालत्या मोटरसायकलीवरुन अनेक लोकांचे मोबाईल हिसकाऊन घेतल्याचे सांगितले.
त्यांचे घराची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे (21) मोबाईल किंमती 2,34,000/ रुपयाचे व गुन्हयात वापरलेली टीव्हीएस. कंपनीची व्हीक्टर मोटरसायकल किंमती 60,000/- असे एकुण 2,94,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असुन आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वर नमुद गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबाबत वरीष्ठांनी
त्यांचे कौतुक केले आहे.
जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.