बुद्धांची लोकशाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून रुजविली -प्रा. डॉ. उत्तम शेंडे
किनवट : मानवमुक्तीचा जाहिरनामा म्हणजे बुद्ध. बुद्ध हा आचरणाचा विषय आहे. बुद्ध ही आचारसंहिता आहे. बुद्धांची हीच लोकशाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून रुजविली अन् भारत बौद्धमय केला. असे प्रतिपादन पांढरकवडा येथील बौद्ध साहित्य अभ्यासक प्रा. डॉ. उत्तम शेंडे यांनी केले.
राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन , वर्षावास समारोप ‘महापवारणा महोत्सव दिवस’ कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके अध्यक्षस्थानी होते. सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके, बौद्ध महासभेचे पर्यटन जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे , तालुका सरचिटणीस माजी प्राचार्य राजाराम वाघमारे हे प्रमुख अतिथी होते.
पुढे बोलतांना डॉ. शेंडे म्हणाले, आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे विकार नष्ट करणे हा सम्यक सम्बुद्ध व डॉ. बाबासाहेबांचा संदेश आहे. हेच विकार नाहीसे करण्याचे ठिकाण म्हणजे बुद्ध विहार.
बोधी पुजेनंतर नंदा नगारे यांनी वंदना घेतली. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी अभिवादन गीत गाईले. बंडू भाटशंकर यांनी प्रास्ताविक व वंदना तामगाडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मायावती सर्पे यांनी आभार मानले. प्रा. पंडित घुले, सुवर्णा मुनेश्वर , प्रमोद भवरे व दीपिका गिमेकर या श्रावकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथ वाचक प्रा. सुभाष गडलिंग यांचा महावस्त्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. गंधकुटी बुद्ध विहाराला सम्यक सम्बुद्ध रूपाचे दान केल्याबद्दल सत्यभामा रमेश महामुने यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्या शुभांगीताई ठमके आपल्या भाषणात म्हणाल्या की, बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे सर्वांनी मिळून केलंलं तप सुखकारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात अनेक संदर्भ उदाहरणे दिलेत. हंस हा कुणाचा ? याचा न्यायनिवाडा देतांना मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे. जो प्रेम करतो. काळजी घेतो. तोच मित्र असू शकतो. बुद्ध आपल्या शिष्याला म्हणाले होते. स्त्रियांना शिकवले नाही तर समाजाची हानी होईल. हेच हेरून डॉ. बाबासाहेबांनी संविधानातून स्त्री शिक्षणाचा हक्क दिला. संविधान हा संपूर्ण देशाचा ग्रंथ आहे. सर्वांची आचारसंहिता आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना अभियंता प्रशांत ठमके म्हणाले की , आपण चांगल्या धम्मात वावरणारे सुजान नागरिक आहोत. बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनातून बुद्ध वचन कळतात. बद्धांनी चार आर्यसत्य , आठ अष्टांगिक मार्ग , दहा पारमिता व अष्टशील सांगितले. हा विचार आचरणासाठी घरातील सर्व तरुण मुला मुलींसह आपण बुद्ध विहारात यावे. कारण आजच्या तरुण पिढीला बुद्ध विचारांची नितांत गरज आहे. त्यांनी बुद्धांनी सांगितलेला जीवन जगण्याचा उत्तम मार्ग अनुसरला तरच त्यांचं कल्याण होईल.
यावेळी निवृत्त विभागीय वन व्यवस्थापक वसंत सरपे, उत्तम कानिंदे , अनिल उमरे, जगदीश भालेराव, समाजसेवक खंडुजी मुनेश्वर, गंगासागर वैरागडे, संगीता मुनेश्वर, जान्हवी भवरे, करुणा पवार, हर्षलता भगत, संगीता पाटील, स्वाती डवरे, कांचन सर्पे, स्मिता कानिंदे, सुषमा पाटील, आशा तेलतुंबडे , स्मिता जाधव, सरिता झडते आदिंसह बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत कावळे, अशोक सर्पे, दीपक जाधव, प्रशांत डवरे, विनय वैरागडे, दिलीप पाटील, मनोहर साळवे, मुकूंद मुनेश्वर, कैलास भरणे, चंद्रशेखर सर्पे आदिंनी परिश्रम घेतले.