सारखणी येथिल नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली देशी दारूचे दुकान हटवा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन-बजरंग वाडगुरे
सारखनी/प्रतिनिधी: सारखणी येथिल नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली देशी दारूचे दुकान थाटण्यात आले असून या ठिकाणी बँक असताना दारु चे दुकान येथे लावण्याचा कोणी घाट घातला याची चौकशी करून त्वरित दुकान हटविण्यात यावे तसे न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे उमरी सर्कल प्रमुख बजरंग वाडगुरे, उपसर्कल प्रमुख निलेश चव्हाण, शाखाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.
याठिकाणी बँकेतील सर्व ग्राहक बँकेचे कामकाज काढण्याकरिता त्या ठिकाणी येत असतात तर काही ग्राहक पैसे उचलून सरळ देशी दारूच्या दुकानात जाऊन दारू पीत बसत असल्यामुळे या परिसरातील महिला वर्ग चिंतातुर झाल्या आहेत. तसेच अनेक दारुडे बँकेच्या आजूबाजूला दारू पिऊन पडून राहत असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या महिला वर्गालाही अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता शासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दारू दुकानांना सील मारून दारू दुकान बंद करणे करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने सदरील दारू दुकान बंद करण्याचे आंदोलन जनतेला घेऊन करण्यात येईल व याची जवाबदारी शासनाची किंवा प्रशासनाची राहील असा इशारा शिवसेनेच्या देण्यात आला आहे.