किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

गोदावरी अर्बनच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा ; जेष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर योजना.

किनवट:जेष्ठ नागरिक हे समाजाचे महत्वपूर्ण घटक असून त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी जागतिक दिनाचे औचित्य साधत गोदावरी अर्बनने नागरिकांसाठी पाऊण टक्का(०.७५) वाढीव व्याजदर दिले आहे.त्यासोबतच पाचही राज्यातील शाखेमध्ये सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आले आहेत.
याप्रसंगी किनवट शाखेच्या वतीने नारायण कटकमवार,अन्नाभाऊ शेलके,केशवराव दासरवार,मुकुंदराव कुसनेनिवार,पद्मावती निलावर,रमेशचंद्र दारमवार,दीपक शिवनकर यांचा सत्कार करण्यात आला.

गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनात गोदावरी अर्बनने जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पाऊण टक्के (०.७५) अधिक व्याजदराची योजना अंमलात आणली आहे.जेष्ठ नागरिक आयुष्यभर काबाडकष्ट करीत आपल्या वृद्धपकाळातील गरजां भागविण्यासाठी जमापुंजी जमा करीत असतात व निवृत्तीनंतर ती रक्कम बँकेत ठेऊन त्यावरील येणाऱ्या व्याजाच्या रक्कमेत आपला उदरनिर्वाह करीत असतात त्यांच्या या गरजेची दखल घेत गोदावरी अर्बनने त्यांच्यासाठी विशेष योजना आखली आहे.

संस्था कायमच जेष्ठ नागरिकांचा सन्मान करत असते,जागतिक महामारी कोरोना काळात देखील संस्थेने आपल्या जेष्ठ ठेवीदारांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेत घरपोच सेवा दिली आहे.इतकेच नव्हे तर वर्षभर पाचही राज्यातील शाखांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरात असलेल्या जेष्ठ नागरीक कट्टा,संघटना यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असते.यासोबतच परिसरातील वृद्धाश्रमात मोफत नेत्र तपासणी,आरोग्य शिबीर,बैठकीचे बाकडे,पिठाची गिरणी,कॉट, रेफ्रिजरेटर,अन्न धान्य आशा त्यांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू संस्थेच्या माध्यमातून विविध दिनाचे औचित्य साधून दाईत्वाच्या उदार भावनेतून देण्यात येते.

यावेळी प्रभारी शाखाधिकारी प्रकाश बेक्कमवार,आनंद जंगम, संदेश कटकमवार, गीतेश कोरटकर आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

112 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.