अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक धरणे यांनी व जिल्हा पोलिस प्रशासनाने किनवट शहरातील नागरीकांचा अंत पाहु नये अन्यथा त्या विरुध्द तिव्र जन आंदोलन छेडण्यात येईल-प्रकाश गब्बा राठोड
किनवट ता. प्र दि ०८ अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक धरणे यांनी व जिल्हा पोलिस प्रशासनाने किनवट शहरातील नागरीकांचा अंत पाहु नये अन्यथा त्या विरुध्द तिव्र जन आंदोलन छेडण्यात येईल अशा गर्भीत इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे.
किनवट शहरातील प्रसिध्द सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्या हत्ये नंतर किनवट शहरातील व्यापा-यांचा व सर्वसामान्य नागरीकांचा रोष हा किनवट पोलिस स्थानकातील अधिकारी व कर्मचा-यांच्या कार्यशैलीवर होता त्या विरुध्द नागरीकांनी प्रचंड रोष व्यक्त करत मयत श्रीकांत कंचर्लावार यांचे मृतदेह किनवट पोलिस स्थानकात ठेवण्याची आक्रमी भुमीका घेतल्या नंतर अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक श्री धरणे यांनी किनवट येथिल विविध शिष्टमंडळाची समजुत काढुन किनवट स्थानकातील भ्रष्टाचारी व निश्क्रीय अशा कर्मचा-या विरोधात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यांनंतर सामनजस्य दाखवत नागरीकानी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले होते, परंतु आता सदर घटनेला १५ दिवसाचा कालावधी उलटुन देखिल कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्याने किनवट शहर व परिसरातील नागरीक हे कमालीचे अस्वस्त असुन नागरीकांच्या रोषाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो असे हि त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
तर या संदर्भात किनवट शहरातील विविध शिष्टमंडळासह आ. भिमराव केराम यांनी शासन व प्रशासनाकडे किनवट पोलिस संदर्भात कारवाई करण्या बाबत पत्र दिले होते त्या दोन्ही पत्रांना जिल्हा पोलिस प्रशासन व महाराष्ट शासनाने केराची टोपली दाखवली असल्याने किनवट या आदिवासी, बंजारा बहुल दुर्गम तालुक्याकडे जिल्हा प्रशासन व महाराष्ट्रा शासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे असे हि तालुका अध्यक्ष राठोड यांनी यावेळी सांगितले. तर नागरीकांच्या सयंमाचा अंत जिल्हा पोलिस प्रशासनाने पाहु नये असे हि भुमिका त्यांनी मांडली असुन या संदर्भात लवकरच किनवट शहरातील व्यापारी, नागरीक विविध राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव यांच्या सोबत बैठक घेऊन किनवट शहरातील पोलिस प्रशासना करिता कशा प्रकारे आंदोलन छेडण्यात यावे या करिता भुमिका घेण्यात येईल असे हि त्यांनी सांगितले.