किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या पुढाकारातून सर्व समाजातील 569 मुलींची झाली थेट निवड

किनवट : आर्थिक मंदी व वाढत्या बेकारीच्या जगात प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी नोकरी करत शिक्षण पूर्ण करण्याच्या उपलब्ध करून दिलेल्या संधीतून सर्व समाजातील 569 मुलींची निवड झाल्याने त्या आता स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटूबांचा विकास करण्यासाठी आधार बनल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, सहायक आयुक्त समाज कल्याण व सहायक आयुक्ता कौशल्य विकास , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड होसूर मध्ये ‘ज्युनिअर टेक्निशियन’ पदाकरिता महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे सर्व जाती , धर्मातील मुलींसाठी भरती शिबीर आयोजित केले होते.
याप्रसंगी या उपक्रमाचे संकल्पक सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, टाटाच्या एचआरए ऐश्वर्या लोंढे , अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्या शुभांगी ठमके यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. मंगळवारी (ता. 27) माहूर , किनवट व हिमायतनगर तालुक्यासाठी शिबीर होते. परंतु नजीकच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व घाटंजी येथूनही आलेल्या सर्वच मुलींपैकी लेखी, कौशल्य व मुलींची फिटनेस चाचण यामधून 569 मुलींची निवड करण्यात आली. बुधवारी (ता. 28) नांदेड जिल्ह्यातील उर्वरित 13 तालुक्यातील मुलींसाठी यशवंत महाविद्यालय , नांदेड येथे भरती शिबीर आयोजित केले आहे. ता. 6 व 7 सप्टेंबर रोजी 415 आदिवासी मुलींची निवड झाली होती. आता आजपर्यंत एकूण 984 मुलींची ‘ज्युनिअर टेक्निशियन’ पदाकरिता निवड झाली आहे. त्यांना नोकरी करत बी.एस्सी (मॅन्युफॅक्चरिंग) पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर त्यांची पदोन्नती सुद्धा होणार आहे.
यावेळी टाटा कंपनीचे मणीकंठम, हरिणी श्रीधर, रंजिता, संजना, सुनिता , आदिंसह 10 सदस्यांचे दोन पथकं, प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी शंकर साबरे, लेखाधिकारी सुनिल पाईकराव , सहायक लेखाधिकारी डी.आर. सिंगारे ,सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) मनोज टिळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आनंद मेथे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वय तथा सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) नितीन जाधव यांनी आभार मानले.
मागील दोन भरती शिबीर हे केवळ आदिवासी मुलींसाठी होते. त्यामुळे भरतीप्रकियेत संख्या कमी दिसायची. यावेळी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके यांनी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांना सर्वच मागास संवर्गातील मुलींची भरती घेण्याविषयी कंपनीशी बोलण्याची विनंती केली. या सुसंवादाने सर्वच संवर्ग जाती-धर्मातील मुलींना लाभ मिळाला.

चौकट
” नोकरी करत आपलं शिक्षण पूर्ण करण्याची सर्व संवर्गातील मुलींसाठी ही नामी संधी आहे. तिचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा , कुटूंबाला आधार द्या व शिक्षण पूर्ण करून आपलं उज्ज्वल भवितव्य घडवा.
-कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, किनवट ”

भरती प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नागनाथ चटलेवाड , मिलिंद मुंडे, महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य शेख हैदर, उपप्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक संतोषसिंह बैसठाकूर, किशोर डांगे, प्रमोद मुनेश्वर आदिंनी परिश्रम घेतले.

145 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.