लहुजी शक्ती सेना चे महाराष्ट्रभर आज धरणे आंदोलन
उस्मानाबाद : केद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या समाजसुधारक प्रबोधनकारांच्या यादीत साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंना डावलून त्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरणारा फाऊंडेशनचा संचालक विकास त्रिवेदी याला तात्काळ निलंबित करावे व महाराष्ट्रभर मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संपुर्ण राज्यभर एक्याच दिवशी लहुजी शक्ति सेनेच्या वतिने एक दिवसीय आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे.
शोषित,पिडीत,दलित,शेतकरी मजूर वर्गाच्या वेदणा – दुःख शंब्दबंध्द करीत शौर्याची दौंलत उधळून महिला व कामगारांचे कष्ट,हाल,वेदना जगाच्या वेशीवर मांडणारे साहित्यभुषण आण्णाभाऊ साठे,पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसुन उपेक्षितांच्या कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे असे सांगणारे थोर विज्ञानवादी प्रबोधनकार साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगप्रसिध्द आहे १३ लोकनाट्य, १३ कथा,६ नाटके,३५ कांदबर्या ,१५ पोवाडे,७ चित्रपटकथा, १ प्रवासवर्णन अशा विपुल लेखनाचे धनी असलेल्या आण्णाभाऊंचे साहित्य जगातील २७ भाषाबरोबरच झेक,पॉलीश, रशियन,इग्रजी,मराठी तामीळ हिंदी मल्याळम आदी भाषेत अनुवादीत झाले आहे मात्र देशातील केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातिल डॉ. आंबेडकर फाउंडेशने अण्णाभाऊ प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित नसल्याचे पत्र काढून तसे कारण पुढे करत प्रबोधनकारांच्या यादीत सामील करण्याचे नाकारण्याची धक्कादायक माहिती गेल्या दिवसात पुढे आली होती.
भारत सरकारने सामाजिक न्याय विभागा मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तयार केले आहे या फाउंडेशन मार्फत देशभरातील महापुरुष समाज सुधारक यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार चे काम केले जाते,
फाउंडेशन तर्फे अनुसूचित जातीसाठी कल्याणाच्या योजना राबविल्या जातात तसेच समाजसुधारक प्रबोधनकारांची जयंती साजरी करताना केंद्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत केली जाते,तथागत गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,संत रविदास, संत कबीर,या महापुरुषांच्या सोबतच राज्य पातळीवरील छत्तीसगडचे संत व सतनामी समाजाचे गुरु बाबा घासीदास, केरळचे पुलियार समाजाचे गुरु संत अयंकली,तामिळनाडूचे गुरु नंदनार,महाराष्ट्रातील संत चोखामेळा संत नामदेव यांचा या यादीत समावेश आहे महाराष्ट्रातून प्रबोधनकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा फाउंडेशन च्या यादीत समावेश करावा या मागणीचा प्रस्ताव 31 जुलै 2011 रोजी केंद्र शासनाचा अंतर्गत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या फाउंडेशन कडे सादर केला होता यादीत आण्णा भाऊंचे नाव सहभागी करून घ्यायचे की नाही या संदर्भात सामायिक न्याय विभागाची बैठक होणे अपेक्षित होते मात्र बैठक न घेताच दिल्लीतील सामाजिक न्याय विभाग फाऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी याने सदर प्रस्ताव नाकारला व प्रस्ताव नाकारताना पत्रात “अण्णाभाऊ इज नॉट वेलनोन पर्सन” असा उल्लेख केला त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे
अशा मजकुराचे पत्र संबधित बिनडोक संचालकाने काढून अण्णाभाऊंच्या कार्यांचा व देशातील उपेक्षित घटकाचा अपमान केला आहे अशा निच प्रवृत्तीच्या विकास त्रिवेदीला अटक करावी त्याच्यावर खटला दाखल करावा त्याची संचालक पदावरून हकालपट्टी करावी व सम्मानपूर्वक साहित्यभुषण आण्णाभाऊ साठेंचे व अनेक क्रांतिकारकांचे गुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव समाजसुधारक प्रबोधनकारांच्या यादीत समाविष्ट करावे असे हजारो निवेदन केद्र सकारला व त्या विभागातील मंत्री यांना पाठवलेले आहेत परंतू आजतगायत सदर बिनडोक संचालकाने माफी देखील मागितलेली नाही व त्या विभागातील मंत्री महोदयांनी त्याच्यावर कार्यवाही देखील केलेले नाही म्हणून लहुजी शक्ति सेना या मातंग समाजाच्या देशव्यापी संघटनेच्या ऊस्मानाबाद जिल्हा पदाधिकार्यांच्या वतिने आपणास मागणी करतोत कि त्या बिनडोक विकास त्रिवेदीला तात्काळ अटक करावी त्याचे निलंबन करावे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उमखेड येथील डॉ हनूमंत धर्मकारे यांच्या खुनाचा तपास वेगाने पुर्ण करून फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी व अमरावती येथील प्रशासनाने हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंचा पुतळा तात्काळ बसवावा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मौजे राजापूरमाट येथील विटभट्टी मालक विकास घेगडे याच्या खोट्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस निरीक्षक व बिट अमंलदार खेडकर यांनी मातंग समाजाच्या दोन निष्पाप तरुणावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत व खंडणी मागून जबर मारहान केलीली आहे तरी सदर खोटे गुन्हे मागे घ्यावेत व संबंधित पोलीस निरीक्षक व बिट अमंलदार तसेच विटभट्टी मालक विकास घेगडे यांच्यावर कायदेशिर कार्यवाई करावी या प्रमुख चार मागण्यांसाठी आज लहुजी शक्ति सेना या देशव्यापी संघटनेच्या वतिने महाराष्ट्रभर एक दिवसीय आंदोलन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणुन आज लहुजी शक्ति सेना ऊस्मानाबाद जिल्ह्याच्या वतिने निदर्शने आंदोलन करून निवेदन देत आहोत वरील मागण्यांचा तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन राज्यभर करण्यात येईल असे मा.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
*प्रमुख मागण्या*
*१)* केद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशचा बिनडोक संचालक विकास त्रिवेदी याच्यावर कायदेशिर कार्यवाई करून त्याचे निलंबन करावे तसेच साहित्यभुषण आण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, क्रांतीवीर फकीरा रानोजी यांची नावे समाजसुधारक प्रबोधनकारांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावीत
*२)* अमरावती प्रशासनाने हटवलेले छत्रपती शिवाजी महाराज व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे याचा पुतळा तात्काळ बसवावा
*३)* यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील वैदयकीय अधिकारी डॉ हनुमंत धर्मकारे यांच्या खुनाचा तपास वेगाने करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी
*४)* अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मोजे राजापूरमाट येथील जातीवादी वीटभट्टी मालक विकास घेगळे यांच्या खोट्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस निरीक्षक व बिट अमंलदार खेडकर यांनी मातंग समाजाच्या दोन तरूणावर खोटे गुन्हे दाखल करून जबर मारहान केलीली आहे व खंडणी मागितलेली आहे तरी संबधित विटभट्टी मालक व बेलवंडी पोलीस निरीक्षक तसेच संबधित बिट अमंलदार खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून मातंग तरूणावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
*माहितीस्तव*
1) *मा.डॉ. विरेद्र खटीक*
केद्रीय मत्री,सामायिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय तथा अध्यक्ष डॉ.अंबेडकर प्रतिष्ठान भारत सरकार नई दिल्ली.
2)जिल्हाधिकारी साहेब अमरावती
3) पोलीस अधिक्षक यवतमाळ
4) पोलीस अधिक्षक साहेब अहमदनगर