भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळ्या निमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ वितरण सोहळा पांगरी ता.नांदेड येथे संपन्न
नांदेड. जिल्हा प्रतिनिधी :नांदेड,विष्णुपुरी पासुन जवळच असलेल्या पांगरी ता.नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड,महाराष्ट्र द्वारा यावर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा साजरा होत आहे.यानिमित्त ग्रंथ वितरण सोहळा दि.२८ जुलै २०२४ रोजी पांगरी ता.नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला होता.
या सोहळ्यात जे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत कारण यावर्षी “ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक”(९०३३ ओव्या) हा संकल्प यावर्षी पूर्ण होत आहे. यापूर्वी पारायणात बसलेल्या सर्व साधकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मोफत व घरपोच वितरण करण्यात आलेली आहे. प्रत्येकानी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन “घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी” हे ब्रीद पूर्णत्वास नेण्यासाठी पवित्र अश्या श्रावण महिन्यात आपल्याच घरी बसून पारायण करण्याची संकल्पना आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांनी केली होती.ते स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण होत आहे.
आतापर्यंत आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने मागील वर्षी पर्यंत ६७४५ ग्रंथ वितरण करण्यात आले.आणि काल २६५० ग्रंथ वितरण करण्यात आले.असे एकूण ९३९५ ग्रंथ वितरण करण्यात आले आहेत..या ग्रंथ वितरण सोहळ्यासाठी आम्ही वारकरी परिवारातील मार्गदर्शक हभप रावसाहेब पा.शिराळे, हभप रामजी पा.शिंदे,हभप दत्तराम पा.येडके, हभप रामराव पा.माने, हभप प्रभाकर पा. पुयड, हभप दत्तरामजी गोरठेकर,
हभप शिवाजी पा.हातने संस्थेचे अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर,सचिव हभप व्यंकट महाराज माळकौठेकर ,हभप चंपतराव पा.डाकोरे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख,हभप अनिता ताई पतंगे महिला आघाडी अध्यक्ष,हभप कुसुमताई शिंदे,हभप स्वाती कपाटे, सर्व संस्थापक सदस्य ,सर्व तालुका स्तरीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे आदरणीय हभप एकनाथ दादा पवार कंधार – लोहा मतदार संघाचे भावी आमदार यांच्या कडून १००० ग्रंथराज ज्ञानेश्वरी भेट स्वरूपात दिली होती. या निमित्ताने श्री एकनाथ दादा पवार लोहा -कंधार शिवसेनेच्या वतीने श्री संजय पा. ढाले शिवसेना तालुकाप्रमुख लोहा, श्री योगेश पा. नंदनवनकर युवा सेना जिल्हा समन्वयक नांदेड, श्री डी.बी.पाटील इंगोले उपजिल्हाप्रमुख युवासेना नांदेड, श्री सतीश पा. ढाकणीकर अध्यक्ष युवक काँग्रेस लोहा,श्री गोविंद पा. ढाकणीकर युवा सेना तालुका अध्यक्ष लोहा,श्री आनंदराव कपाळे, श्री अविनाश शिराळे बालाजी पा. जाधव, श्री विश्वांभर इंगळे,श्री दिलीप पा. जाधव,केशव महाराज,बंडु कानगुले तसेच स्वभिमानी कुंभार समाज सामजिक संस्थेचे अध्यक्ष श्री विजय देवडे,सचिव श्री शिवाजी पांगरेकर व इतर पदाधिकारी व आम्ही वारकरी परिवारातील सर्व लहान थोर शेकडो मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन हभप राम महाराज पांगरेकर यांचे मोठे बंधू श्री गंगाराम पांगरेकर यांनी केले होते. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
असे प्रसिध्दीपत्रक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल जिल्हा ऊपप्रसिध्दी प्रमुख रामभाऊ चन्नावार यांनी दिले