वाढीव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन च्या कामा ऐवजी इतर कामे करावीत.साजिद खान व फिरोज तवर यांची मागणी
किनवट ता.प्र दि ०५ शहरात नगर परिषद किनवट यांच्याकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम चालु आहे त्या अनुषंगाने शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम चालु आहे यामुळे शहरातील मजबुत रस्ते खोदण्याचे काम चालु आहे खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात सर्वत्र चिखल झाला आहे यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यावरुन वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे यामुळे लहानसहान अपघात व्हायचे प्रमाण वाढले आहे तर पादचा-यांना देखिल अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांना होत असलेल्या या समस्यां पाहता माजी नगराध्यक्ष व नगरसेवक साजिद खान व माजीवाढीव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन च्या कामा एवजी इतर कामे जसे फिल्टर संयत्र बसवणे, पाण्याच्या टाक्या उभारणे, शहरा बाहेरील पाईपलाईन लागणे इ शहराध्यक्ष फेरोज तवर यांनी संयुक्त निवेदन सादर केले आहे व त्याव्दारे नगर परिषद प्रशासनाला मागणी केली आहे कि, शहरात होत असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन च्या कामा एवजी इतर कामे जसे फिल्टर संयत्र बसवणे, पाण्याच्या टाक्या उभारणे, शहरा बाहेरील पाईपलाईन लागणे इत्यादी कामे या पावसाळ्याच्या दिवसात करण्यात यावे जेणे करुन नागरीकांना या कामामुळे कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही.
या समस्ये बद्दल शहरातील ज्येष्ठ नागरीकांनी व ज्येष्ठ पत्रकारांनी देखिल आपला रोष व्यक्त केला आहे परंतु नगर परिषद प्रशासनाने याबद्दल कोणतेही पाऊले उचलेली नाही यामुळे नगर परिषद प्रशासन व नागरीक यांच्या खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत आहे. यातही शहरातील वार्ड क्रमांक १ व वार्ड क्रमांक २ व वार्ड क्रमांक ७ मध्ये प्रचंड पाणी टंचाई जाणवत असुन दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा नगर परिषदे कडुन करण्यात येत असल्याने नागरीकांचे आयोग्य धोक्यात आले आहे. या वार्ड मधुन मोठा जागावाजा करुन नागरीकांनी लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना निवडुन दिले परंतु ते सर्वसामान्य प्रश्नांना देखिल दाद देत नसल्याने या वार्ड मधिल नागरीक नगरसेवकांना जाब विचारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही मर्जीतील नागरीकांच्या घरी स्वखर्चाने पाणी पुरवठा केला जात असल्याचे ही निदर्शनास आल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.