किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट शहरातील मानाच्या व नोंदणीकृत १८ व घरगुती गणपतीचे विसर्जन कोणत्याही अणुचित प्रकाराशिवाय शांततेत सम्पन्न

किनवट ता.प्र दि २० “पुढच्या वर्षी लवकर या”, या वर्षी नाही जमल आम्हाला तुमचा यथोचित सत्कार, कमतरता होती तुमच्या स्वागताला सत्काराला व उत्सवाला परंतु पुढच्या वर्षी नाही राहणार कोणताही कसर” अशी आशा व्यक्त करत अनंत चथुर्दशीच्या दिवशी किनवट शहरातील मानाच्या व नोंदणीकृत १८ व घरगुती गणपतीचे विसर्जन कोणत्याही अणुचित प्रकाराशिवाय शांततेत पार पडले.
किनवट नगर परिषदेने पैनगंगा नदीतीरावर योग्य ती व्यवस्था केली होती निर्माल्य संकलन, विसर्जन करिता भोई बांधवांच्या चमुची नियुक्ती, कर्मचा-यांची तैनाती वगैरे व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे किनवट शहरातील विसर्जन हे अत्यंत सुखकर संपन्न झाले. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अणुषंगाने शासनातर्फे विविध निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे नेहमी प्रमाणे जो लवाजमा विसर्जन स्थळी असतो तो लवाजमा नसल्याने सर्व प्रमुख गणेश मंडळाचे विसर्जन हे लवकर संपन्न झाले. शहरातील श्री च्या विसर्जन निमित्त नगर परिषद व पोलिस स्टेशन तर्फे योग्य तो बंदोबस्त करण्यात आला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरिक्षक मारोती थोरात यांनी विसर्जन निमित्त शहरात योग्य तो बंदोबस्त तैनात केला होता. तर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी नगर परिषदे तर्फे सकाळ पासुनच ठेवण्यात येणा-या बंदोबस्ताची धुरा सांभाळली होती त्यांनी विसर्जन मार्गाची स्वच्छता, जागो जागी नगर परिषद तैनात, पैनगंगा घाटावर प्रकाश व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, निर्माल्या संकलन आदि बाबींची योग्य प्रकारे काळजी घेतली होती. तर शहरातील परंपरे प्रमाणे नगर परिषदेच्या प्रांगणात विसर्जन मिरवणुकी दरम्यान ज्येष्ठ नागरीकांना बसण्याची व्यवस्था केलेली असते ती या वर्षीही करण्यात आली ज्यामध्ये माजी नगराध्यक्ष इसा खान, के. मुर्ती, दिनकर चाडावार, व्यंकटराव नेम्मानिवार, साजिद खान, पत्रकार प्रदिप वाकोडीकर, उपनगराध्यक्ष वेंकट नेम्मानिवार, संदिप केंद्रे, श्रीनिवास नेम्मानिवार, शिवा क्यातमवार, फेरोज तवर, शिवा आंधळे, कचरु जोशी, सुनिल मच्छेवार यांच्यासह विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्ये, नागरीकांनी भेट देऊन किनवट शहरातील परंपरा कायम ठेवली.

184 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.