तालुक्यातील सर्वच मोबाईल कंपन्या चे नेटवर्क सलाईनवर!..आमदार/खासदारांनी पुढाकार घ्यावा.
किनवट/प्रतिनिधी: नेटवर्क अभावी किनवट शहर व तालुक्यातील सर्वच मोबाईल कंपन्यामार्फत ग्राहकांचे ” डेटा पॅक ” च्या नावाने आर्थिक फसवणूक होत असून शेकडो रु.चे मारलेले अनलिमिटेड डेटा पॅक फुकट वाया जात आहे.
सध्या किनवट शहर व तालुक्यातील सर्वच मोबाईल कंपन्या चे नेटवर्क 4जी ऐवजी 2जी ही नेटवर्क देत नसल्याने ग्राहक वैतागले असुन ऑफिसमधील ऑनलाईन ची अनेक कामे खोळंबली आहेत. अनेक महागडे नेटवर्क पॅक मारून नेटवर्क च मिळत नसल्यामुळे नेटकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.
यासाठी या मतदार संघातील आमदार व खासदार यांनी पुढाकार घ्यावा असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
93 Views