काँग्रेस प्रदेश सचिव परविन शेख यांना अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित
किनवट: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महिला पत्रकार परवीन शेख तसेच भारती झळके यांना ग्रामपंचायत कार्यालय गोकुंदा येथे येथील महिला सरपंच श्रीमती अनुसयाताई सिडाम व उपसरपंच सरु भाई शेख यांच्या हस्ते ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले..
यावेळी माजी सरपंच सलीम भाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पप्पू कर्णेवार, ज्ञानेश्वर मुनेश्र्वर, बिसमिल्लाह शेख, कांबळे, गुहाडे, गोनारकर, संजय भाऊ, वच्छला मामी, भिसे सर, मुकाडे ताई, ग्रामसेवक मावळे आदींची उपस्थिती होती.. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले
70 Views