अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या किनवट तालुका अध्यक्षपदी संतोष अडकिने पाटील यांची नियुक्ती
किनवट/प्रतिनिधी: (आनंद भालेराव)- अखिल भारतीय किसान कांग्रेस जिल्हा नांदेड च्या किनवट तालुका अध्यक्षपदी धडाडीचे युवा कार्यकर्ते संतोष अडकिने पाटील यांची नियुक्ती करण्यातआहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून नांदेड किसान काँग्रेसच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नांदेड जिल्हा अध्यक्ष माधव पवळे यांनी नियुक्ती केली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राहुल गांधी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किसन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे व पक्षाचे ध्येय धोरणे व विचार तळागाळातील घराघरांमध्ये पोहोचण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाचा विचार व देशहित समाजहित व शेतकरी शेतमजूर यांच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी आपण प्रयत्न करावे .अशा शुभेच्छा नांदेडचे जिल्हाध्यक्ष माधव पवळे यांनी नियुक्तीपत्राद्वारेद दिल्याआहेत.
त्यांच्या निवडीमुळे किनवट तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांचे नक्कीच योगदान लाभणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पत्रामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून किनवट तालुक्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस ची सत्ता आणण्यासाठी त्यांचे कार्य व मोलाचे ठरणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल किनवट तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांकडून तसेच किनवट तालुक्यातील त्यांच्या मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.