श्रीमती मोहनाबाई मारोती वाघमारे यानी पतीच्या चौथ्या स्मृतिदिन निमित्ताने कौटुंबिक कार्यक्रमासाठी येणारा खर्च घरी न करता गेली तीन वर्षे शाळेतच वृक्षारोपण व आर्थिक मदत देऊन साजरा केला
(नांदेड – ) / दि 17 बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील श्रीमती मोहनाबाई मारोती वाघमारे यानी पतीच्या चौथ्या स्मृतिदिन निमित्ताने कौटुंबिक कार्यक्रमासाठी येणारा खर्च घरी न करता गेली तीन वर्षे शाळेतच वृक्षारोपण व आर्थिक मदत देऊन साजरा केला.यावर्षी किनवट तालुक्यातील गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.शाळेला ५ हजार एकावन्न रुपये देणगी दिली.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.शाळेला आर्थिक मदत देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन चौथ्या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन केले.
विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले विशेष अंक दिले
सामाजिक जाणिवेचे भान ठेवत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी अशी मदत केली जाते.
शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास विशेष पाहुणे आप्पाराव पेठ केंद्राचे केंद्रप्रमुख कौड सत्यनारायण, वरिष्ठ मुख्याध्यापक प्रमोद रत्नाळीकर, सरपंच सुधाकर राठोड उपस्थिती होते .
श्रीमती मोहनाबाई वाघमारे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपत सामाजिक जाणिव ठेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात असा उदात्त दृष्टिकोन समोर ठेऊन शाळेसाठी बटव्यातून (चंची )५०००/- रुपयांची देणगी दिली.श्रीमती मोहनाबाई वाघमारे यांचा मुलगा दिलीप मारोती वाघमारे गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.ते सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पांडोझरी बाबरवस्ती जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.एप्रिल २०२३ या महिन्यात आंतरजिल्हा बदली होऊन गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावं आणि आपली स्वप्ने पूर्ण करावी असे मार्गदर्शन कौड सत्यनारायण यांनी केले.
रत्नाळीकर मनाले कुटुंबाला दारिद्र्य आणि अज्ञानी स्थितीतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. कितीही प्रतिकूल परिस्थिती ला अनुकूल करता येऊ शकते, याचे मुर्तीमंत उदाहरण स्थापित केले. त्यांच्या स्मृती लोककल्याणकारी उपक्रम साजरे करुन जपण्याचा प्रयत्न कुटूंबियांनी केलेला आहे.
यावेळी दिलीप वाघमारे म्हणाले की, शाळेसाठी अजून काही द्यावे लागले तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. तसेच माझ्या वडिलांनी केलेल्या कार्याचा मला व माझ्या कुटुंबाला सार्थ अभिमान आहे.वडील कै मारोती चांदू वाघमारे यांनी गरीब व प्रतिकूल परिस्थितीतून काबाडकष्ट करुन आम्हा भावंडांना उच्च शिक्षण दिले.हा बिकट प्रसंग त्यांनी त्या ठिकाणी सांगितला आई मुलांसाठी खुप काही करत असते तितकेच वडील ही आपल्या साठी तळमळीने कष्ट करतात.वडिलांच्या संकल्पनेचा मी एक पाईक असून माझी माय मोलमजुरी करून ५ हजार शाळेसाठी मदत निधी देण्याचा मायचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भावुक होऊन त्यांनी आपल्या वडीलांना श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली अर्पण केली.
आपल्या भावनांना त्यांनी अश्रूं वाटे वाट करून दिली.वाघमारे परिवाराच्या या कार्याचे गटशिक्षणाधिकारी पं.स. किनवट ज्ञानोबा बने व शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड व ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे
यावेळी बळीराम नाईक ,सुरेश जाधव, व्हिपीसिंग राठोड, सरदास जाधव, प्रदीप राठोड, मनीषा जाधव, लता जाधव, दुर्गादास आडे, सखाराम राठोड, अनुसया राठोड, मधुकर जाधव, धूपसिंग राठोड, धारासिंग राठोड,सर्व विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शाळेतील उपशिक्षक दिलीप वाघमारे, व ज्ञानेश्वर पांमपटवार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दिलीप वाघमारे यांनी केले.तर आभार बस्वराज अचारे यांनी केले.