किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आदी विकासात्मक कामाबाबत सर्च ऑपरेशन केले सुरू

किनवट:(किनवट प्रतिनिधी)
किनवट- माहूर मतदार संघाच्या विकासाला केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. अशोक पाटील सूर्यवंशी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आदी विकासात्मक कामाबाबत सर्च ऑपरेशन सुरू केले असून त्यांनी आज गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधाचा जायजा घेतला.रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, सिटीस्कॅन,डायलेसिस् मशीन डॉक्टर कर्मचाऱ्यांची उपस्थिती व औषधी साठ्याची पाहणी करून तंत्रज्ञ, ऑपरेटर व रुग्णालयाच्या जमीनच्या मालकी हक्क नोंदणीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यासंदर्भात सहा जिल्हाधिकारी कीर्तीकेएन एस यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

किनवट विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन प्राप्त करून देणारे व विकासाला केंद्रबिंदू मानून या मतदारसंघात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनां तसेच विकासनिधीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. अशोक पाटील सूर्यवंशी यांनी येथील सोयी सुविधांचे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. त्या दृष्टीने आज त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली असून रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, अंतर रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, सिटीस्कॅन मशीन, डायलिसिस मशीन, रुग्णालयातील स्वच्छता, औषधी साठा, डॉक्टर कर्मचाऱ्यांती उपस्थिती याचा जायजा घेतला .सिटीस्कॅन मशीनला तंत्रज्ञ व रेडिओलॉजिस्ट नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे . तंत्रज्ञ व रेडिओलॉजिस्ट उपलब्ध व्हावा या दृष्टीने वैद्यकीय अधीक्षक मनोज घडसिंग यांच्याशी चर्चा केली व वरिष्ठांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी केली. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. घडसिंग यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भाचा मुद्दा मांडल्यानंतर त्याची तात्काळ दाखल घेऊन डॉ सूर्यवंशी यांनी वैद्यकीय अध्यिक्षक यांना सोबत घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकेएन .एस यांची भेट घेतली. शेत सर्वे नंबर 106 मध्ये एकूण 6 हेक्टर 65 आर एवढी जमीन उपजिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात आहे. परंतु सातबारा उताऱ्यावरील मालकी रकान्यात वेगवेगळ्या नावाच्या नोंदी असल्याने रुग्णालयाच्या विस्तारीकरणास तसेच 100 खाटाचे रुग्णालय मंजूर होण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही अडचण तात्काळ दूर करून रुग्णालयाची जमीन भोगवटादार 1 म्हणून रुग्णालयाच्या मालकीची नोंद करावी अशी मागणी डॉ. सूर्यवंशी यांनी केली असून तसे निवेदन सादर केले आहे. शंभर खाटाचे रुग्णालय मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे अशोक पाटील सूर्यवंशी यांनी सांगितले.यापूर्वी त्यांनी किनवट माहूर मतदारसंघातील अनेक रस्त्यांची स्वतः उपस्थित राहून पाहणी केली. किनवट विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यावधी रु चा निधी मंजूर होतो.निधीचा योग्य प्रकारे विनीयोग होऊन नागरिकांना रस्ते, आरोग्य सुविधा, पाणी, सिंचनाची कायमस्वरूपी दर्जेदार सोय व्हावी या दृष्टीने मी येथील विकास कामावर लक्ष ठेवून आहे. भाजपाच्या कार्यकाळात या मतदारसंघाचा जेवढा विकास झाला तेवढा विकास यापूर्वी कधीही झालेला नाही.असे अशोक पाटील सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते राघू मामा भाजपाचे युवा नेते बाळकृष्ण कदम, तालुका उपाध्यक्ष सुभाष कालावर, गजू आरमाळकर, प्रमोद पहुरकर, जिल्हा सदस्य हौसाजी काकडे, मनोर ताटे, शहर उपाध्यक्ष नरसिंग तक्कलवार, माणिकराव पाटील, लक्ष्मीकांत मुंडे नौशाद खान, जितेंद्र कुलसंगे, दत्ता जायभाय, सुर्यकांत जाधव, तुषार घोगरे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

384 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.