बरबड्याच्या गावरान शेवाळी मिर्चीला देशात मोठया प्रमाणात मागणी
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.19.जिल्यातील नायगावं तालुक्यात असलेल्या बरबडा येथील प्रसिद्ध असणारी गावरान लाल मिरची यंदा मोठया प्रमाणात उत्पन्न झाले आहे.
येथील गावरान मिरचीसाठी प्रसिद्ध लाल मिरची तोडणीची लगबग सुरू आहे.तोडणीपूर्वीच महाराष्ट्रासह इतर राज्यात सुद्धा या भागातही मिरचीची मागणी होताना दिसून येत आहे.
येथील अनेक व्यापाऱ्यांनी मिरची खरेदीसाठी आपले नियोजन व्यवस्थित रित्या करताना दिसून येत आहे.त्यामुळे बरबड्याच्या मिरचीचा ठसका संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याने या गावरान मिरचीची एक वेगळी ओळख आता निर्माण झाली आहे.
काही वर्षांपूर्वी नाहिसी झालेली मिरची पुन्हा एकदा दिसू लागल्याने शेतकरी व व्यापारी एकदम खुशीने या मिरची चा खरेदी विक्री करतांना दिसून येणार असल्याची आणि भाव पण जास्त मिळत असल्याची जोरदार चर्चा होत आहे रंगाने लाल भडक व खायला चवदार असलेल्या या मिरचीची “बरबडयाची गावरान मिरची” याच नावाने काही व्यापारी बरबड्या ची मिरची म्हणून विशेष ख्याती आहे.
यंदा बरबड्यात शेकडो हेक्टरवर मिरचीची लागवड असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी मिरचीला प्राधान्य दिले आहे.
काही वर्षांपूर्वी या भागात मिरचीचे उत्पन्न अधिक दर्जेदार होत असताना मराठवाड्यासह इतर राज्यातही या मिरचीचा बोलबाला होता.परंतु अज्ञात अळीचा प्रादुर्भाव,उत्पन्नात होणारी घट,कमी प्रमाणात मिळत असलेला भाव यामुळे शेतकऱ्यांनी या मिरचीकडे पाठ फिरवली होती.मात्र आता खुप वर्षांनंतर शेतकऱ्यांनी आता मिरचीसाठी विशेष प्रयत्न करून नामशेष होत असलेली बरबड्याची ओळख आता जपायला सुरुवात केली आहे.
पुन्हा एकदा बरबड्या ची मिरची या नावाने आपल्या गावाची ओळख शेतकरी नव्याने करत असल्याचे हे उदाहरणं आहे.
आम्ही तीन एकरामध्ये गावरान मिरची पिकाची लागवड केली आहे.यंदा कमी अधिक थंडी,धुक्यामुळे मिरचीवर थोडा फार परिणाम झाला आहे.पंधरा वर्षापूर्वी गावतला प्रत्येक शेतकरी मिरचीची लागवड करीत होता.पण उत्पन्न कमी आणि भावात होत असलेला तफावत पाहून शेतकऱ्यांनी मिरचीला नापसंत केलं.आम्ही देखील मिरचिकडे दुर्लक्ष केलं होत.पण मागील चार वर्षापासून आम्ही मिरचीची लागवड करतो.
आमची संपूर्ण मिरची ही अलिबाग येथील व्यापारी हस्मुखलाल हे खरेदी करतात.यंदा मिरचीला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे
– श्री.मारोती मोदड,शेतकरी बरबडा
निसर्गाच्या लहरीपणा,कीटक यामुळे नामशेष होत असलेले आमची बरबड्याची गावरान शेवाळी मिरचीचं उत्पन्न यंदा चांगलं असून,कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कृषी तज्ञाकडून आम्हाला मिरची पिकासाठी मार्गदर्शन मिळाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मिरची जगवली आणि हा प्रयोग यशस्वी देखील केला.या भागातील गावरान मिरचीला भरपूर मागणी असून,पुढील वर्षी मिरचीच क्षेत्र अजून वाढेल.फक्त मिरचीला चांगला भाव मिळावा एवढीच अपेक्षा आहे..